Beed Accident : रॉंग साईडने जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, एकजण जखमी

Beed News : बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दुचाकीला कारने रॉंग साईडला जात जोराची धडक दिली
Beed News
Accident NewsSaam tv

बीड : बीडच्या नेकनूर जवळ एक अपघात घडला आहे. यात पोलीस अधिकाऱ्यांच्या दुचाकीला रॉंग साईडने जाणाऱ्या करणे धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाला आहे. सदर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून कार चालक फरार झाला आहे. 

Beed News
Jalgaon Accident : मुलाला शाळेत सोडून घरी परतताना काळाचा घाला; दुचाकीने मागून धडक दिल्याने पित्याचा मृत्यू

राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार (Beed) बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दुचाकीला कारने रॉंग साईडला जात जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) एक जण ठार तर अन्य एक जण जखमी झाला आहे. श्रीधर नन्नवरे असं अपघातात ठार झालेल्या पीएसआयचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग ५४८ वरून आज पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी सिरसाळ्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुडचे पीएसआय श्रीधर नन्नवरे हे दुचाकीने जात होते. यावेळी स्विफ्ट कारने धडक दिली. 

Beed News
Dharashiv news : पिक कर्ज वसुलीसाठी हजारो शेतकऱ्यांची बँक खाती केली होल्ड; ऐन मशागतीच्या वेळी बँकांकडून शेतकऱ्यांची कोंडी

कारची धडक इतकी जोरात होती कि यात श्रीधर नन्नवरे हे रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर सोबत असलेले नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळावरून कार चालक फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. हा भीषण अपघात (CCtv) सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com