Palghar Rickshaw And Bike Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Palghar Accident: पालघरमध्ये भरधाव दुचाकीची रिक्षाला धडक, शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू; ६ गंभीर

Palghar Rickshaw And Bike Accident: पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

पालघरमधन भीषण अपघाताची (Palghar Accident) घटना समोर आली आहे. दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू-जव्हार मार्गावर अपघाताची ही घटना घडली. सकाळी ११ वाजता वरोतीजवळ बाईक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. संगीता सुभाष डोकफोडे (१४ वर्षे) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अपघातात मृत्यू झालेली संगीता वांगर्जे येथून सूर्यानगरला शाळेत जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रिक्षातील प्रवाशांसह दुचाकीस्वार असे एकूण सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रवासी उतरत असल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. तेवढ्यात या रिक्षाला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा पलटी झाली.

दरम्यान, डहाणू -जव्हार मार्गावर खड्डे असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले . मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले असताना देखील हा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातात अंकिता हाडल ही सातवीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली आहे. त्याचसोबत लता बेडगा, प्रमोद लोहार, रमेश कोदे , रिक्षाचालक भास्कर डोकफोडे आणि दुचाकीस्वार कैलास धानमेहेर हे जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

Monsoon 2025 : मुंबईतून मान्सूनचा काढता पाय, ३ दिवसात राज्यातून गायब होणार, आज कुठे कुठे कोसळधारा?

SCROLL FOR NEXT