Dahanu Virar Train : डहाणू-विरार लोकलसेवा १५ तासानंतरही ठप्पच; मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai Local Train News : मालगाडीचे डब्बे घसरल्याने डहाणू-विरार लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली असून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
डहाणू-विरार लोकलसेवा १५ तासानंतरही ठप्पच;  मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
Dahanu-Virar local Train serviceSaam TB

पालघर स्टेशनजवळ मंगळवारी (ता. २८) सायंकाळच्या सुमारास एक मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावर झाला आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात होऊन १५ तास उलटले तरीही अद्याप रुळांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे बुधवारी पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकलसेवा बंद आहे. परिणामी मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

डहाणू-विरार लोकलसेवा १५ तासानंतरही ठप्पच;  मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
Sangli Accident News : भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील ६ जण ठार, सांगलीतील भयानक घटना

अनेक लोकल बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने रुळांची दुरुस्ती करून लोकस सेवा सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, आजही उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. दुपारपर्यंत रेल्वे मार्ग सुरळीत केला जाणार असून लोकल सेवा सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या पालघर स्टेशनजवळ काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. गुजरात येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरले होते. यामुळे ट्रॅक नंबर दोन तीन आणि चार हे नादुरुस्त झाले.

या मोठा फटका पश्चिम रेल्वेवर झाला. अप आणि डाऊनची दोन्हीही रेल्वे सेवा प्रभावीत झाली. सायंकाळपासून लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यानाही विलंब झाला. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. बुधवारी सकाळपासूनच प्रवासी रेल्वे स्थानकात ताटकळले होते.

Edited by - Satish Daud-Patil

डहाणू-विरार लोकलसेवा १५ तासानंतरही ठप्पच;  मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारने तरुणाला चिरडले, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com