Sangli Accident News : भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील ६ जण ठार, सांगलीतील भयानक घटना

Sangli Car Accident News : सांगलीत भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
Sangli Car Accident News
Sangli Car Accident NewsSaam TV

सांगली जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तासगाव-मणेराजुरी मार्गावर भीषण अपघात झाला. चिंचणी येथे भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्देवी घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

Sangli Car Accident News
Pune Accident Case : मोठी बातमी! अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलणारा मास्टरमाइंड कोण? पोलीस चौकशीत नाव उघड

राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०) सुजाता राजेंद्र पाटील (वय ५५) प्रियांका अवधूत खराडे (वय ३०) राजीव विकास पाटील (वय २) ध्रुवा पाटील (वय ३) कार्तिकी (वय १) अशी मृतांची नावे आहेत. तर स्वप्नाली विकास भोसले (वय ३०) असं जखमी महिलेचं नाव आहे.

तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मयत कुटुंब हे तासगाव मधील रहिवासी असल्याची माहिती आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरात राहणारे पाटील कुटुंबिय मंगळवारी कामानिमित्त कारने बाहेरगावी गेले होते.

रात्री उशीरा गावाकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार तासगाव-मणेराजुरी मार्गावरील खोल कॅनॉलमध्ये कोसळली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

रात्रीची वेळ असल्याने पाटील कुटुंबियांना वेळेवर मदत मिळाली नाही. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली.

Sangli Car Accident News
Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डिजीटल पुराव्यांसाठी AI चा वापर, पोलिसांचा महत्वाचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com