अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपघाताची घटना'एआय'द्वारे जिवंत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पुरावे मिळविण्यासाठी पोलीस शिताफीचे प्रयत्न करत आहे. आता डिजीटल पुराव्यांसाठी 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'चा वापर केला जाणार आहे.
अपघाताप्रकरणी डिजिटल पुराव्यासाठी पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला होता. कल्याणीनगर अपघातातील (Pune Porsche Car Accident) दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. आता ही घटना पोलीस 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' द्वारे जिवंत करणार आहेत. डिजिटल पुरावे गोळा करण्यावर पुणे पोलीस भर देत आहे. पोलिसांनी सगळे डिजीटल पुरावे गोळा केले आहेत. आता त्याचा सिक्वेन्स लावून ही घटना एआयद्वारे जिवंत केली जाणार आहे. यासाठी संबंधित तज्ञांची मदत घेतली जाणार (Digital Evidence) आहे.
'एआय'मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन तरूणाने इतर दोन तरूणांना चिरडल्याची घटना १८ मे रोजी घडली होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या पालकांकडून पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात (Pune News) आहेत. त्यांना ससून रूग्णालयातील डॉक्टर मदत करत असल्याचं देखील समोर आलीय. याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली आहे.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी (Porsche Car Accident AI) रोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीचे रक्त चाचणीचे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर चौकशीच्या अगोदर काल ससून रूग्णालयातील एक कर्मचारी देखील पळून गेल्याचं समोर आलंय. आता ही अपघाताची घटना 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'चा वापर करून जिवंत केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.