विधानभवनाबाहेर दूध दराचा प्रश्न पेटला आहे. शेतकऱ्यांनी विधानभवनाबाहेर दूध ओतून सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. या शेतऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातामध्ये सरकारविरोधातील फलक घेऊन त्यांनी आदोलन केले. १५ हजार टन दूध पावडर आयात का केली जातेय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे. आमच्या प्रतिलिटर दूधाला ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी सध्या महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.
एकीकडे विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे दूध दरवाढीमुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत राज्यभर आंदोलन सुरी केली आहेत. विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक होत त्यांनी आंदोलन केले. विधानभवनाबाहेरच दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विधानभवनाबाहेरील शेतकरी आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा हा सगळा परिणाम आहे. महाराष्ट्रातील मूळच्या दूध पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दूधाचे भाव खाली नेले आहे. कारण आज बाजारात आपण पॅकेटमधील दूध विकत घ्यायला गेलो तर त्याच्या किंमती कमी झाल्या नाहीत. तर जवळपास ७० लाख लिटर दूधावर प्रक्रिया करून याचे पावडर आणि बटर तयार केले जाते. पावडरच्या किंमती कमी झाल्यामुळे या पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी दूधाच्या खरेदीचा भाव २४- २५ रुपये खाली आणला आहे. त्याचा एकूणच दूध बाजार भावावर परिणाम झाला.'
राजू शेट्टी यांनी पुढे सांगितले की, 'सध्या सर्वत्र दूधाचे भाव कमी झाले आहेत. या पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी ज्यावेळी पावडरला ४०० ते ५०० रुपयाच्या आसपास भाव होता त्यावेळी अमाप पैसा कमावला. आता पावडरचे भाव कमी झाल्यामुळे दूधाच्या खरेदीचे भाव कमी झाले आहेत. सरकारने आधी पावडर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर टाच आणली पाहिजे. त्याच्यामध्ये भर म्हणून की काय २६ जूनला केंद्र सरकारने एक अधिसूचना काढून १० हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला. म्हणजे ऐका बाजूला म्हणायचे दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जे कराययचे ते उद्योग करायचे.'
तसंच, 'केंद्र आणि राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे हा सर्व परिणाम झाला आहे. उद्याच्या बैठकीला ठराविक लोकांना बोलावण्यात आले आहे. राज्य सरकराने केंद्राच्या या भूमिकेला आक्षेप का घेतला नाही. सरकारची ही नौटकी आहे. शेतकऱ्यांनी विधानभवानापुढे दूध ओतले असेल तर ते चुकीचे नाही. हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. पावडर उत्पादन कंपन्यांना मदत करून मलमपट्टी लावू नका. द्यायचे असेल तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसा जमा करा. तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.', असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.