16 Year Old Girl Dies Of Heat Stroke Saam Tv
महाराष्ट्र

Palghar News: पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, शेतामध्ये आढळला मृतदेह

16 Year Old Girl Dies Of Heat Stroke: राज्यातील उष्णाघाताच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशामध्ये पालघरमध्ये (Palghar) उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं या मृत मुलीचे नाव आहे.

Priya More

राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. राज्यातील उष्णाघाताच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशामध्ये पालघरमध्ये (Palghar) उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं या मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला चालला आहे. पालघरमध्ये १६ वर्षांच्या विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे (heat stroke) पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या विक्रमगडमधील केव वेडगे पाडा येथे ही घटना घडली आहे. अश्विनी विनोद रावते या मुलीचा दुपारच्या सुमारास उष्माघाताने मृत्यू झाला.

अश्विनीचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे . अश्विनी ही मनोरमधील एस.पी.मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. अश्विनी आज अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती. तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली. अश्विनीचे शेत हे मूळ गावापासून काही अंतरावर असल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता .

घरी आलेल्या आई-वडिलांनी अश्विनीचा शोध सुरू केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात सध्या विक्रमगड महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पंचनामा सुरू आहे. अद्याप अश्विनीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आला नाही. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT