Maval News: मामा, मला लग्न करायचं नाही; मी आत्महत्या करतोय...तरुणानं सकाळी मेसेज पाठवला, दुपारी मृतदेह आढळला

Maval Youth : मावळच्या तळेगावमध्ये नवरदेवाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. आपल्याला लग्न करायचं नाही, असा मेसेज करत तरुणाने आत्महत्या केलीय.
Maval News: मामा, मला लग्न करायचं नाही; मी आत्महत्या करतोय...तरुणानं सकाळी मेसेज पाठवला, दुपारी मृतदेह आढळला

(दिलीप कांबळे)

मावळ: वाढत्या अपेक्षा आणि करिअर घडवण्याच्या नादात अनेक तरुण-तरुणींचं लग्न होत नाही. तर काही उपवर मुलांच्या आणि मुलींच्या मुलांकडून अपेक्षा अधिक असल्याने अनेकांना त्यांच्या लग्नात अडचणी येत असतात. लग्न होत नसल्याने तरुण-तरुणी नैराश्यात जात असतात. त्यातून ते आत्महत्या करत असतात. परंतु मावळमध्ये एक विचित्र घटना घडलीय.

मावळच्या तळेगावमध्ये नवरदेवाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. आपल्यालाल लग्न करायचं नाही असं म्हणत एका मुलाने आपलं जीवन संपवलंय. या घटनेमुळे लग्न सोहळ्यावर शोककळा पसरलीय. सुरज राजेंद्र रायकर आज पहाटेपासून घरातून बेपत्ता होता. त्यानंतर आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विहिरीतून मृतदेह आढळून आला. बाहेर काढण्यात आला आहे. मला लग्न करायचं नाही. मी आत्महत्या करत आहे. असा मॅसेज त्याने आत्महत्यपूर्वी मामाला केला होता. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिलीय. सुरजचं लग्न ठरलं होतं असं सांगण्यात येत आहे.

विवाहितेची आत्महत्या; संतापलेल्या माहेरच्या मंडळींना घर पेटवलं

एका विवाहित महिलेनं सासरी आत्महत्या केली. संतापून माहेरच्या लोकांनी तिच्या सासरचं घर पेटवल होतं. या आगीत होरपळून तिच्या सासू आणि सासऱ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे घडली होती. प्रयागराजमध्ये सूडाच्या आगीत दोन जणांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली. हे प्रकरण मुठीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

अंशिका केसरवाणी ही महिला संशयास्पद स्थितीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे तिच्या संतप्त पालकांनी तिचं सासरचं घर पेटवलं. त्यामध्ये अंशिकाची सासू शोभा देवी आणि सासरे राजेंद्र केसरवाणी यांचा होरपळून मृत्यू झाला.

Maval News: मामा, मला लग्न करायचं नाही; मी आत्महत्या करतोय...तरुणानं सकाळी मेसेज पाठवला, दुपारी मृतदेह आढळला
Beed News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com