Gold Rate: लग्नसराईत ग्राहकांना मोठा झटका, सोन्याचा भाव 75 हजारपार

Gold Rate In Maharashtra: सोन्याचे भाव ७५ हजारांच्या वर पोहचले आहे. सोन्याचे भाव वाढल्यामुळे लग्नसराईच्या काळामध्ये ग्राहक नाराज झाले आहेत. ऐन लग्न सराईची धुमधाम सुरू असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे कोलमडले आहे.
Gold Rate
Gold Rate Saam Tv

देशामध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्न म्हटलं की सोन्याचे दागिने आलेच. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मागणी वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. सोन्याचे भाव ७५ हजारांच्या वर पोहचले आहे. सोन्याचे भाव वाढल्यामुळे लग्नसराईच्या काळामध्ये ग्राहक नाराज झाले आहेत.

आज जळगाव शहरातील सराफ बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली असून आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे भाव हे ७५ हजार ३७० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी ८६ हजार ५०० रुपये झाली आहे. येत्या काळामध्ये सोन्या-चांदीचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. ऐन लग्न सराईची धुमधाम सुरू असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे कोलमडले आहे.

Gold Rate
Sharad Pawar Sabha: ना पावसाची भीती, ना उन्हाचा ताण! शरद पवार पेटवणार निवडणुकीचा रान; २२ दिवसांत घेणार ५० सभा

सोन्याच्या भावामध्ये वाढ झाल्यामुळे सराफ बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा सोनं खरेदी करण्याकडे कल कमी दिसून येत आहे. सोन्यामधील गुंतवणूक अधिक प्रमाणात वाढली असून जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सोन्याचे भाव वाढत आहे. सराफा बाजारामध्ये आज ग्राहकांची लगबग कमी दिसून आली. सोनं कधी घ्यावे हा विचार ग्राहक करत आहे. आतापर्यंतची ही सोन्याच्या भावातील सर्वात मोठी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.

Gold Rate
MLA Kailash Patil : धाराशिवचे आमदार कैलास पाटील चक्कर येऊन पडले; ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारावेळी उष्माघाताचा त्रास

दरम्यान, गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,८१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७४,२८० रुपये (Price) मोजावे लागले. आज सोन्याच्या (Gold) भावात ९८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८७,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली.

Gold Rate
Cm Eknath Shinde On Salman Khan: सरकार खान कुटुंबीयांच्या पाठीशी उभं, सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com