Palghar Shocking News Saam Tv
महाराष्ट्र

Palghar: बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडलं, बाळाला घेऊन २ किमीपर्यंत पायपीट; पालघरमधील संतापजनक घटना

Palghar Shocking News: पालघरमध्ये एक संतापजनक घटना घडली. प्रसुती झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यात सोडलं. महिलेला बाळासोबत तब्बल २ किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली.

Priya More

Summary -

  • बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेने अर्ध्या रस्त्यात सोडलं

  • पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यातील संतापजनक घटना

  • गावापासून दोन किलोमीटर आधीच बाळंतीण महिलेला बाळासोबत खाली उतरवलं

  • कुटुंबीयांनी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध संताप व्यक्त केला

फैय्याज शेख, पालघर

पालघरच्या मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या आमला गावातील एका महिलेची प्रसुती झाली. बाळ झाल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिकेने अर्धवट रस्त्यात सोडून दिले. या बाळंतीण महिलेला नवजात बाळाला घेऊन तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. घटनदाट जंगलामध्ये बाळंतीण महिलेला आणि तिच्या बाळाला रुग्णवाहिकेने अर्ध्या रस्त्यात खाली कसं उतरवलं? असा संतप्त सवाल केला जात आहे.

प्रसुती झालेली महिला सविता बारातला बुधवार १९ नोव्हेंबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला काही कारणास्तव जव्हार कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. तिची प्रसुती सुखरूप झाली. रविवार २४ नोव्हेंबरला तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र रुग्णवाहिका चालकाने या महिलेला आणि तिच्या बाळाला गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर घनदाट जंगलाच्या ठिकाणी उतरवून रुग्णवाहिका निघून गेली.

सविता बारात यांच्यासोबत त्यांच्या आई आणि सासूबाई होत्.या त्यांना बाळाला आणि प्रसुती झालेल्या सविता यांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागली . या सर्व घटनेचा त्याच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे . प्रसूत महिलेला काही झाले असते तर त्याला जबाबदार कोण असते? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबानी केला आहे. जव्हार मोखाड्यात सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढत असतानाच अशा पद्धतीने निर्जनस्थळी एका प्रसुती झालेल्या मातेसह तिच्या नवजात बालकाला सोडून दिल्याचा हा प्रकार धक्कादायक आणि हादरवणारा असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय .

दरम्यान, मोखाड्यात प्रसुती झालेल्या महिलेला तिच्या नवजात बाळासोबत दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली. या घटनेवर पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णवाहिका चालक दोषी आढळ्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! माजी मिस इंडियाचा घटस्फोट होणार? पतीवर मानसिक - शारीरिक छळाचा आरोप

Ethiopia Volcano Ash: सावधान! इथियोपिया ज्वालामुखीची राख भारतात, दिल्लीसह आणि राजस्थानात पसरलं विषारी धुकं

Maharashtra Live News Update : ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी त्यांच्या विजय पक्का - उपमुख्यमंत्री

Shocking: 'तू भारतीय नाही तर चिनी आहेस...', शांघाय विमानतळावर महिलेचा १८ तास छळ

12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

SCROLL FOR NEXT