Sakshi Sunil Jadhav
पालघर जिल्हा हा समुद्रकिनारे, धबधबे, हिरवेगार डोंगर आणि शांत निसर्गासाठी ओळखला जातो. अनेकांना वीकेंडला लोनावळा-खंडाळ्यासारखा निसर्ग अनुभवायचा असतो, पण लांबचा प्रवास टाळायचा असतो.
सुंदर व्ह्यू पॉइंट, मस्त वारा आणि ट्रेकिंगसाठी छोटा पण सुंदर रूट तुम्हाला पालघरमध्ये पाहायला मिळेल. लोणावळासारखा हिल स्टेशन फील देते.
निसर्गरम्य दृश्ये, धुकं आणि ट्रेकर्ससाठी कमी गर्दीचा हा किल्ला आहे. मॉन्सूनमध्ये तर स्वर्गच वाटतो.
समुद्रकिनारा आणि समुद्रकाठचं प्राचीन मंदिर असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. शांतता हवी असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे.
छोट्या-मोठ्या अनेक धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आहे. मॉन्सूनमध्ये येथे अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं. तसेच थंडीत धुक्यातील वातावरण पाहायला मिळतं.
लोणावळा-खंडाळ्याचा खरा फील! हिरव्या डोंगरकडा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट आणि राणीचं महालसुद्धा पाहता येतं.
स्वच्छ बीच, शांत वातावरण आणि चिकू गार्डन हे फॅमिली ट्रिपसाठी उत्तम ठिकाण आहे. कमी गर्दीचे अन् धमाल करण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
चांगला रोड, शांत पाणी आणि सुंदर व्ह्यू असणारे हे ठिकाण पिकनिक, फोटोग्राफी आणि कपल्ससाठी ‘हिडन’ रोमँटिक स्पॉट्स म्हणून प्रसिद्ध आहे.