Shreya Maskar
केळवा बीच पालघरमध्ये आहे. हे ठिकाण मुंबईच्या जवळ असल्यामुळे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
केळवा बीच मऊ आणि सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे. येते शांत आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते.
केळवा बीच हा सुरू वृक्षांनी वेढलेला आहे. हिवाळ्यात येथे हिरवेगार वातावरण पाहायला मिळते.
सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो. केळवा बीचला वीकेंडला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
केळवा बीचजवळ केळवा किल्ला आणि श्री शीतला देवी मंदिर आहे. तुम्ही केळवा बीचला सुंदर फोटोशूट देखील करू शकता.
केळवा बीचवर कॅम्पिंगचा आनंद घेता येतो. तसेच येथे मैदानी खेळ खेळले जातात. लहान मुलं वाळूमध्ये किल्ला बनवतात.
केळवा बीचला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून भेट द्या. कारण तेव्हा येथे थंडगार वातावरण अनुभवता येते.
तुम्ही डहाणू ट्रेन पकडून पालघर स्टेशनला उतरा. त्यानंतर पालघर स्टेशन वरून तुम्ही रिक्षाने केळवा बीचला जाऊ शकता.