Palghar Leopard Attack: चिमुरड्यांनी बिबट्याला पळवलं, दप्तरानं वाचवला विद्यार्थ्याचा जीव

Leopard Attack On 11 Year Old Student: राज्यात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. गावागावात बिबट्याची दहशत आहे. मात्र एका चिमुकल्यानं बिबट्याला पळवून लावलंय. त्यानं दप्तराची कशी ढाल केली आणि बिबट्याला कसा पिटाळून लावलंय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Leopard Attack On 11 Year Old Student
BRAVE 11-YEAR-OLD CHASES LEOPARD AWAY USING SCHOOL BAG IN MAHARASHTRAsaam tv
Published On
Summary
  • मयंक कुवरा प्रसंगावधान राखल्यानं बचावला.

  • मयंक आणि त्याच्या मित्रानं आरडाओरड करत बिबट्यावर दगडफेक केली

  • गावात बिबट्याच्या दहशतीनं भीतीचं वातावरण.

या जहाबांज आणि धाडसी वाघाला बघा. होय हा वाघच. कारण यानं चक्क बिबट्याला पळवलंय. होय होय तुम्ही जे ऐकलंय. त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्यये.. याच 11 वर्षांच्या चिमुरड्यानं आणि त्याच्या एका मित्रानं बिबट्याचा हल्ला परतवत त्या बिबट्याला धाडसानं प्रसंगावधान राखत पळवून लावलंय. (इथून पुढे बिबट्याचा पळवतांनाचा व्हिडीओ लावा) हा बघा हाच तो बिबट्या आहे ज्याला वाघाच्या काळजाच्या या निडर चिमुरड्यानं पळवून लावलंय. त्याच्या सोबत नेमकं काय घडलं ऐका.

Leopard Attack On 11 Year Old Student
धक्कादायक! नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरला; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा व्हिडिओ

ऐकलंत, त्यानं काय सांगितलं. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आणि त्यानं हा हल्ला कसा परतवून लावला पाहा.

ठिकाण - पालघर, विक्रमगड

11 वर्षीय मयंक संध्याकाळी अटावली आदर्श विद्यालयातून शाळा सुटल्यानंतर घरी निघाला

घर 4 किमीवर असल्यानं तो जंगलातून चालत असतांना बिबट्यानं झडप घातली

बिबट्यानं मान पकडण्यासाठी मागून झडप घातली आणि त्याचा वार दफ्तरावर झाला

दफ्तर फेकत त्यानं प्रतिकार केला त्याचवेळी बिबट्याचं नख त्याच्या हाताला लागलं

मयंक आणि त्याच्या मित्रानं आरडाओरड करत बिबट्यावर दगडफेक केली

पालघरचा इयत्ता पाचवीत असलेला मयंक कुवरा प्रसंगावधान राखल्यानं बचावला. पण या हल्ल्यात तो जखमी झालाय. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केलेत.

Leopard Attack On 11 Year Old Student
घरात बिबट्या शिरल्याचा थरार; विद्यार्थ्याने चप्पल फेकून केली खात्री|VIDEO

जसा मयंक हा चिमुरडा भाग्यवान ठरला तसे सगळेच ठरतात असं नाही कारण चिमुरड्यांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना राज्यात याआधीही समोर आल्यायेत. परिसरात बिबट्या फिरत असतांनाही वनविभाग त्याची दखल घेत नसल्याचं स्थानिकांचे म्हणणं आहे. त्यामुळे बिबट-मानव संघर्ष रोखायचा असेल तर वनविभागानं सजग आणि मानवानं सावध राहणं गरजेचं आहे. एवढं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com