Ambulance Blast in Jalgaon News Update : अंगाचा थरकाप उडवणारा जळगावमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, ॲम्बुलन्स २० फूट दूर (oxygen cylinder explosion in ambulance Jalgaon) जाऊन पडली. चालकाच्या समयसूचकतेमुळे गरोदर महिला आणि डॉक्टराचा जीव वाचला. चालकाने वेळीच दोघांनीही खाली उतरवले. जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल मुंबई नागपूर महामार्गावर पंपाजवळ ही घटना घडली. (Ambulance Blast Video News)
धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. धक्कादायक म्हणजे, ही घटना पेट्रोलपंपाच्या जवळ घडली. चालकाच्या समयसूचकतेमुळे ॲम्बुलन्समधील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टरांचा जीव वाचला. स्फोट इतका भयंकर होता की, ॲम्बुलन्सच्या चिंधड्या झाल्या. वाहानाचे अवशेष हवेत उंच उडाले होते. आवाजाने आजूबाजूचे लोकही थोडावेळ घाबरले. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले.
ऑस्किजन सिलिंडरचा स्फोट बुधवारी रात्री दहा वाजताच्या आसपास झाला. हा स्फोट इतका भयानक होता की ॲम्बुलन्स वीस फूट दूर जाऊन पडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. ॲम्बुलन्सला अगोदर अचानक आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गियर बदलत असताना गाडीत आगीची ठिणगी उडाली. चालक राहूल बाविस्कर याला काही तरी गडबड असल्याचा अंदाज आला. त्याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाईकांना त्यानं दुसऱ्या वाहनाने पाठवले. हे वाहन जाताच अॅम्बुलन्समध्ये मोठा स्फोट झाला.
स्फोट इतका भयानक होता की, आजूबाजूच्या वाहनांना देखील मोठा हादरा बसल्याची माहिती मिळाली. आग लागल्यानंतर जळगाव मनपा फायर ब्रिगेडच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासभरानंतर आग आटोक्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.