Operation Tiger inside story Maharashtra politics Saam Tv
महाराष्ट्र

Operation Tiger: ४ वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर; वाचा'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी

Operation Tiger inside story Maharashtra politics: महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला.

Priya More
  • ४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप

  • ठाकरेसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा

  • एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर

  • दिल्लीतील गुप्त बैठका आणि चार्टर्ड विमानांची चर्चा

रोहित कदम, साम टीव्ही

मध्य रात्रीच्या अंधारात ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं. ठाकरेसेनेत मोठी फूट पडलीये. ठाकरेसेनेच्या 6 खासदारांना दिल्लीत कसं नेण्यात आलं? शिंदेंनी हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी मध्यरात्री कुणाची भेट घेतली? पाहूयात ऑपरेशन टायगरची इनसाईड स्टोरी...

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप झालाय. ठाकरेसेनेला पुन्हा मोठं खिंडार पडलंय. सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिंदेसेनेत विलीन होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र या फुटीच्या इनसाईड स्टोरीची स्क्रीप्ट गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत लिहिणं सुरू होतं. या सहा खासदारांना फोडण्यासाठी विशेष यंत्रणा कामाला लागली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच देखरेखीखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नेमकं हे ऑपरेशन कसं आखलं गेलं आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली ते पाहूयात...

शिंदेसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या लग्नाच्या वाढदिवसाला डिनर डिप्लोमसीत या ऑपरेशन टायगरची सुरूवात झाली. मतदारसंघांमधील निधी आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांवरून नाराज असलेल्या ठाकरेसेनेच्या खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी दिल्लीत गुप्त बैठक घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीकडे पाच खासदारांनी पाठ फिरवली आणि या ऑपरेशनची अंमलबजावणी सुरू झाली. 16 जूनला रात्री चार्टर्ड विमानं सज्ज करण्यात आली. सर्व खासदारांसाठी स्वतंत्र चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली. एका खासदारानं हैदराबादला कारनं प्रवास केला आणि तिथून विमानानं दिल्लीत दाखल झाला. तर इतर दोन खासदारांसाठी नांदेडमध्ये दोन विमानं पाठवण्यात आली. तर शिर्डीतूनही एक खासदार प्रायव्हेट विमानानं दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर पुण्यातून एका खासदाराला विमान पाठवण्यात आलं. संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकरांसाठी रात्री नांदेडमध्ये विमान पाठवण्यात आलं. तिथून त्यांना थेट विमानानं दिल्लीला पाठवलं.

एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाण्याआधी जयपूरमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीये. यावेळी रात्री उशीरा दोघांमध्ये ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. तर दुसरीकडे, महाऱाष्ट्रात ठाकरेसेनेच्या 6 पैकी एका खासदाराने हैदराबादपर्यंत कारने प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यानंतर तेथून विमानाने दिल्लीपर्यंत विमानाने प्रवास केल्याची माहिती आहे. तसंच, अन्य दोन खासदारांनी स्वतंत्रपणे नांदेड विमानतळावरून चार्टर्ड विमानानं उड्डाण करून दिल्लीपर्यंत प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तर ठाकरेसेनेच्या एका खासदारानं मुंबईवरून दिल्लीला विमानाने प्रवास केल्याचं बोललं जातंय. इतकंच नव्हे तर ठाकरेसेनेच्या आणखी एका खासदाराने शिर्डीवरून थेट दिल्लीला विमानानं प्रवास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या सगळ्यात ओमराजे निंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याचा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सर्व खासदारांनी स्वतंत्रपणे दिल्लीपर्यंतचा प्रवास केल्यानं याबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

तर दुसरीकडे, पक्षफुटीच्या ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना जोरदार टोला लगावलाय. दरम्यान, प्रतापराव जाधवांच्या लग्नाच्या वाढदिवसातील डिनर डिप्लोमसीपासून याची सुरूवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मतदारसंघातील निधी आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांवरून नाराज असलेल्या खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी दिल्लीत गुप्त बैठक घेतली होती. इतकंच नव्हे तर भरघोस निधीसह थेट राज्यमंत्रिपदाच्या ऑफर्सही देण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ठाकरेसेनेतील खासदारांच्या फुटीमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ब्लॉक, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

Pune University: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT