OBC Reservation Saam tv
महाराष्ट्र

OBC Reservation: मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचाही सरकारला इशारा; मुंबईत आंदोलनासाठी मागितली परवानगी, सरकार काय निर्णय घेणार?

OBC Reservation Protest: मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजानेही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे.

भारत नागणे

OBC Reservation update:

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजानेही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसीचे हे आंदोलन प्रत्येक तालुका, जिल्हा आणि मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी द्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी आज पंढरपुरात केली आहे. (Latest Marathi News)

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नये, तसा निर्णय घेतल्यास ओबीसी समाज 2024 च्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवेल असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपुरात धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी प्रकाश शेंडगे आज पंढरपुरात आले आहेत.

'जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईमध्ये आंदोलन आयोजित केले आहे. आम्ही देखील आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन पुकारले आहे, असे शेंडगे म्हणाले.

'सध्या सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली लाखो रुपये वाटप करत आहेत. त्याप्रमाणेच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनाही सरकारने आर्थिक मदत द्यावी. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारने मराठा समाजाच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ही गंभीर बाब आहे. ओबीसी समाजाच्या अध्यक्षाची व सदस्यांची सरकारने हाकलपट्टी केल्याचा आरोपी प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

'मराठा समाजाने 70 वर्षे सत्ता भोगली आहे. आमच्या हाती पाच वर्षे सत्ता द्या सगळ्या समाजाला न्याय देवू असे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे पाटलांनी आधी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग, आता धनंजय मुंडेंचा कांचनसोबतचा फोटो व्हायरल

Saturday Horoscope : जुने संकल्प पूर्ण करा, काम लांबवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात अडचणी येतील, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Diabetic Tips: तुम्हीपण मधुमेहाचे रुग्ण आहात? मग 'या' पदार्थाचं सेवन करणं ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update:वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण; ठाण्यातील कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांचे प्रेरणादायी भाषण

Mumbai To Ekvira: मुंबई ते एकवीरा प्रवास कसा कराल? जाणून घ्या सर्वात सोयीस्कर मार्ग आणि टिप्स

SCROLL FOR NEXT