Shivraj Rakshe News
Shivraj Rakshe News Saam Tv
महाराष्ट्र

Shivraj Rakshe : ...आता राज्य सरकारने नोकरीची संधी द्यावी; ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे याची मागणी

रोहिदास गाडगे

Maharashtra Kesari Shivraj Rakshe : 14 जानेवारी रोजी पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला पराभूत केले. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरताच त्याच्या गावी ग्रामस्थांनी जल्लोष केला. त्यावेळी शिवराजच्या कुटुंबीतील सदस्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. 

आज महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) विजता पैलवान शिवराज राक्षे राजगुरुनगर येथील राक्षेवाडी या मुळगावी दाखल झाला. यावेळी कुटुंबियांसह खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) शिवराजचे स्वागत केले. यावेळी शिवराजने राज्य सरकारने आता तरी नोकरीची संधी द्यावी अशी मागणी केली.

शिवराज म्हणाला की, महाराष्ट्र केसरी हे माझ्यासाठी आईवडिलांचे स्वप्न होतं. मात्र, अडचणींचा डोंगर समोर होता आणि त्यातुनही कुटुंबाने साथ दिली. महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन यायचे असा मनापासून निश्चय केला होताच अशी भावना शिवराजने व्यक्त केली.

मागच्या वर्षी राज्याला गोल्ड मेडल मिळवून दिलं. मात्र त्यावेळी मला नोकरी मिळाली नसल्याची खंत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने व्यक्त करत आता सरकारी नोकरीची संधी द्यावी अशी आपेक्षा व्यक्त केली,

यावेळी खासदार कोल्हेंनी राज्यातील क्रिडा धोरणात खेडाळुंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक धोरण उभं करण्याची गरज असून शिवराजच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्द दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharman Joshi Birthday : शर्मन जोशीला ‘इडियट’ नाव कसं मिळालं?; अभिनेत्याच्या करियरला ‘या’ चित्रपटांमुळे मिळाली कलाटणी!

Hair Care Tips: Dry Hair च्या समस्येने हैराण? घरगुती तूपाच्या मदतीने दूर करा समस्या…

Sangli Constituency : प्रकाश शेंडगे यांच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक; रायकीय वर्तुळात खळबळ

Mumbai University Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवीन वेळापत्रक

Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

SCROLL FOR NEXT