Maharashtra Kesari: शेवटी तो बोललाचं! अन्याय झाला, निर्णय चुकीचा होता? सिकंदर शेखने स्पष्टच सांगितले; यापुढे...

लढतीत सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा कुस्ती शौकिनांमधून सुरू झाली आहे. याबद्दल पहिल्यांदाच सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली आहे.
Sikandra Shekh
Sikandra ShekhSaamtv

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडून दोन दिवस झाले मात्र या स्पर्धेची चर्चा अद्याप सुरुच आहे. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे पैलवान सिकंदर शेख. उपांत्य फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली, या लढतीत सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा कुस्ती शौकिनांमधून सुरू झाली आहे. याबद्दल पहिल्यांदाच सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली आहे. (Mahatashtra Kesari)

Sikandra Shekh
Sikandar Shaikh: जित से ज्यादा हार के चर्चे! मैदान हरला, पण कुस्तीचा 'सिकंदर' तोच ठरलायं; हारुनही हिरो ठरतोय सिकंदर शेख

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर सिकंदर शेखच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट, आणि स्टोरीज व्हायरल झाल्या होत्या. त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात होती. याबद्दल बोलताना "एक कुस्ती हारली म्हणून मी संपलो नाही, मला जरी पंचांनी चुकीचे गुण दिले असले तरी पुढच्या महाराष्ट्र केसरीची गदा माझ्याकडेच असेल," असा विश्वास सिकंदर शेखने यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना , "माझ्याकडून कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडलेल्या नाहीत. पंचांना धमकी देण्याचे प्रकरण हे धमकी नसून त्यांची फोनवरुन फक्त चौकशी केली आहे, याला आपण चौकशी म्हणू शकत नाही. तसेच पैलवानालाही आपल्या हक्कासाठी बोलण्याचा अधिकार आहे. यापुढेही मी लढत राहीन," अशी गर्जनाही त्याने यावेळी केली आहे.

Sikandra Shekh
Beed Accident : चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार थेट दीडशे फूट खोल दरीत; ३ जण गंभीर जखमी

दरम्यान, ६५ व्या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यांचा थरार पुण्यात (Pune) पार पडला. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत मानाची चांदीची गदा उंचावली. या स्पर्धेत हरल्यानंतरही सोशल मीडियावर सिकंदर शेखचे जोरदार कौतुक करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्यावर अन्याय झाल्याचेही बोलले जात होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com