Sikandar Shaikh: जित से ज्यादा हार के चर्चे! मैदान हरला, पण कुस्तीचा 'सिकंदर' तोच ठरलायं; हारुनही हिरो ठरतोय सिकंदर शेख

कुस्ती हरली असेल, मैदान मारलही नसेल, पण प्रत्येक पोराठोराच्या स्टेटसला, फेसबूकच्या पोस्टमध्ये सिकंदर शेखचेच कौतुक होताना दिसत आहे.
Sikandra Shekh
Sikandra ShekhSaamtv
Published On

Maharashtra Kesari: ६५ व्या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यांचा थरार कालच पुण्यात पार पडला. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत मानाची चांदीची गदा उंचावली. या लक्षवेधी लढतीसोबतच शिवराज राक्षेच्या यशाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे. (Maharashtra Kesari)

मात्र, नेटकऱ्यांनी सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड कडून पराभूत झालेला मल्ल सिकंदर शेखची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. स्टेट्स, भल्यामोठ्या पोस्टमधून सिकंदर शेखच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. त्याचसोबत त्याच्या या पराभवात राजकारण झाल्याचीही चर्चा कुस्ती शौकिनांमधून सुरू आहे.

Sikandra Shekh
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; पुण्यात कार्यक्रमादरम्यान घडली घटना

परिस्थितीवर मात करत गाजवतोय मैदान...

सोशल मीडियावर कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेला सिकंदर शेख अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत तयार झालेला मल्ल आहे. सिकंदरचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ. घरात आजोबांपासून कुस्तीची परंपरा, पण घरात अठराविश्य दारिद्रय अन गरिबी. सिकंदर शेखचे वडिल रशिद शेखसुद्धा पैलवानकी करायचे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत सिकंदरनेही लाल माती अंगावर घेतली.

अलिकडच्याच काळात सिकंदरने मोठमोठ्या कुस्त्यांमध्ये भल्याभल्या पैलवानांना आस्मान दाखवले. सिकंदरने आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत. आपल्या वडिलांचे कष्ट दुर करण्यासाठी तो अलिकडेच सैन्यातही भरती झाला. सैन्यदलाकडून खेळत तो लाल मातीत नाव कमावत आहे.

Sikandra Shekh
Nepal Plane Crashed: नेपाळ विमान दुर्घटनेनंतर बचावकार्याचा थरारक VIDEO; नागरिकांची धावपळ अन्...

कुस्त्यांमधून केली बक्षिसांची लयलूट...

आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.

सोशल मीडियावर त्याचीच चर्चा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भुमिका घेतली गेली नाही. खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहिर करण्याचा प्रयत्न दिनेश गुंड यांनी का केला? असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. कुस्ती हरली असेल, मैदान मारलही नसेल, पण प्रत्येक पोराठोराच्या स्टेटसला, फेसबूकच्या पोस्टमध्ये सिकंदर शेखचेच कौतुक होताना दिसत आहे.

त्यामुळे शहर में तेरी जित से ज्यादा मेरी हार के चर्चे है असाच काहीसा प्रकार या लाल मातीतल्या सिकंदरच्या बाततीत घडताना दिसत आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com