Nepal Plane Crashed: नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात घडला आहे. या अपघातात आतापर्यंत ३२ प्रवासांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. काठमांडूहून येणारे विमान नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाचजवळ कोसळले.घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेनंतर सध्या विमानतळ बंद आहे.
विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटमध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, दोन कोरियन, प्रत्येकी एक आयरिश, अर्जेंटिनियन आणि फ्रेंच नागरिक होते. या घटनेचा आणि तेथील बचावकार्याचा थराराक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
अपघाताबाबत माहिती देताना यती एअरलाइन्सचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, यती एअरलाइन्सच्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. त्यात दोन मुलांसह 10 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले.
दरम्यान, हवामान खराब असल्यानेही या विमानाचे उड्डाण करण्यात आले. यामुळेच हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पोखरा विमानतळ डोंगराने वेढलेले आहे. त्याचबरोबर हवामानही खराब होते. तरीही उड्डाण करण्यात आल्याने हा अपघात घडल्याचीही माहिती समोर आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.