Maharashtra Teachers Election : बंडखोर उमेदवारांना राष्ट्रवादीचा दणका! थेट पक्षातून केली हकालपट्टी

शेवटचा दिवस असूनही अर्ज मागे न घेतलेल्या उमेदवारांची राष्ट्रवादीने काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

Maharashtra Teachers Election : राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधरसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक उमेदवारांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती येथील निवडणुकीतं चित्र स्पष्ट झालं आहे. मराठवाड्यात बंडखोरी चर्चेत आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Political News : महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

दुसरीकडे नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. शेवटचा दिवस असूनही अर्ज मागे न घेतलेल्या उमेदवारांची राष्ट्रवादीने काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये नागपुरातील सतीश इटकेलवार, औरंगाबादेतील प्रदीप सोळुंके यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे औरंगाबादेतील स्थानिक नेते प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी करुन विक्रम काळे यांना आव्हान देत शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांना अर्ज माघे घेण्यासाठी आज कळवण्यात आले. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्यांची पक्षातर्फे हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे पत्रही जारी करण्यात आले आहे. (Maharashtra Political News)

Sharad Pawar
Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान अपघात का होतात? समोर आलं धक्कादायक कारण

दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपची उमेदवारी याच मतदारसंघातून दोन टर्म आमदार राहिलेले नागो गाणार यांना जाहीर झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिक्षक सेनेचे गंगाधरराव नाकाडे यांनी माघार घेतली.

तर राष्ट्रवादीचे सतीश ईटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली. बंडखोरी केल्यामुळे ईटकेलवार यांना पक्षातून निलंबित केल्याचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी जाहीर केले. या शिवाय काँग्रेस कोणत्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com