Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमान अपघात का होतात? समोर आलं धक्कादायक कारण

नेपाळमध्ये विमान अपघातात आतापर्यंत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Nepal Plane Crash
Nepal Plane Crash Saam TV

Nepal Plane Crash : नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्रवासी विमान कोसळल्याने 68 पेक्षा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात 4 भारतीयांचा समावेश आहे. दरम्यान हा अपघात नेपाळमधील पहिला अपघात आहे का? नेपाळमध्ये सतत विमान अपघात का होतात? यामागे काही धक्कादायक कारणे समोर आली आहेत. (Latest Marathi News)

Nepal Plane Crash
Fake Currency : सावधान! तुमच्या खिशातील २०० रुपयांची नोट नकली? बनावट नोटांचे बंडलच सापडले

विमान प्रवास हा इतर प्रवासांपेक्षा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र, नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षात कितीतरी विमानांचे अपघात झाले आहे. आणि या अपघातात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऐन मकर संक्रातीच्या दिवशी नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान कोसळलं (Plane Crash) आणि 64 हून अधिक प्रवाशांचा जीव गेला. त्यामुळं पुन्हा एकदा नेपाळमधील या विमान अपघातांची चर्चा होत आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू इथं सप्टेंबर 1992 मध्ये पाकिस्तान एअरलाइन्सचं विमान कोसळलं होतं. यामध्ये 167 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. नेपाळमधील विमान अपघातांपैकी हा सर्वात मोठा अपघात होता. हा अपघात खराब हवामानामुळं वैमानिकाचं एअर ट्राफिक विभागाशी संवाद न झाल्यामुळं झाल्याचं अपघाताच्या अहवालात म्हटलं आहे.

नेपाळमधील पाकिस्तान एअरलाइन्सच्या अपघातापुर्वी जुलै 1992 ला झालेल्या अपघातात थाई एअरबसचं विमान कोसळलं होतं. यामध्ये 99 प्रवाशांसह 14 क्रू मेंबरचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर जुलै 1993 मध्ये डॉर्निअर एअर क्राफ्टच्या या अपघातात 16 प्रवाश्यांसह 3 क्रू मेंबरचा मृत्यू झाला होता.

जुलै 2000 मध्ये रॉयल नेपाल एअरलाइन्सचा अपघात (Accident) झाला होता. या अपघातात 23 प्रवासी आणि 3 क्रू मेंबरचा मृत्यू झाला होता. जून 2006 मध्ये यती एअरक्राफ्टच्या झालेल्या या अपघातात 6 प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता. एअरक्राफ्ट ने टेकडीवरील झाडाला धडक दिल्यानं हा अपघात झाला होता.

Nepal Plane Crash
Sikandar Shaikh News: वाद संपता संपेना! सिकंदरविरोधात ४ गुण देणाऱ्या पंचाला थेट पोलिसाकडून धमकी

सप्टेंबर 2006 मध्ये पूर्व नेपाळमध्ये झालेल्या श्री एअर हेलिकॉप्टरच्या अपघातात 24 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ढगाळ हवामानामुळं हा अपघात झाल्याची माहिती नेपाळ हवाई खात्यानं दिली आहे. सप्टेंबर 2011 ला एका छोट्या विमानाचा काठमांडूजवळ अपघात झाला होता. या अपघातात 19 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 10 भारतीयांचा समावेश होता. खराब हवामानामुळं हा अपघात झाल्याचं सरकारी यंत्रणेने म्हटलं आहे.

फेब्रुवारी, 2016 मध्ये नेपाळमधील कालिकत जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात 11 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यामध्ये 2 क्रू मेंबरचा समावेश आहे. यू एस बांगला एअरलाइन्सचा मार्च 2018 मध्ये काठमांडू त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या या अपघातात 49 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचं कारण वैमानिकांची चूक असं नोंदवण्यात आलं आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातात नेपाळचे पर्यटन मंत्री उद्योजक आंग त्शिरिंग शेर्पा यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचं कारण प्रवाशांची बैठक व्यवस्था योग्य पद्धतीने न केल्यानं झाल्याची माहिती समोर आली होती.

Nepal Plane Crash
Pune Crime News: लॉजवर नेऊन मामाच्या पोरीवर अत्याचार; आत्येभावाचं क्रूर कृत्य

गेल्या वर्षी मे 2022 ला टाटाएअरलाइन्सचं विमान कोसळलं होतं. यामध्ये क्रू मेंबरसह 22 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा अपघात खराब हवामानानं झाला होता. मे, 2012 डॉर्निअर विमानाच्या झालेल्या या अपघातात 21 प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता.

आत्तापर्यंतचे सर्व अपघात पाहिले असता, बहुतांश विमानाचे अपघात हे नेपाळमधील खराब हवामान, डोंगराळ भाग यामुळं झाले असल्याचं निदर्शनास येते. त्यामुळं खराब हवामान असताना नेपाळमध्ये विमान प्रवास टाळला तर अधिकच योग्य होईल.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com