Sanjay Raut On Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंनी सांगितलं कुणालाही CM करा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राच्या मनात उद्धव ठाकरेच!

Sanjay Raut On Uddhav Thackeray : ''काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर कुठला चेहरा देत असेल तर त्याला त्याला समर्थन देण्यासाठी तयार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच आहे'', असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले

Satish Kengar

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

''जागावाटपवरून आमच्यात कुठलाही मतभेद नाही. उद्धव ठाकरे यांनी कधीच नाही सांगितलं, मला मुख्यमंत्री बनायचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर कुठला चेहरा देत असेल तर त्याला त्याला समर्थन देण्यासाठी तयार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच आहे'', असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, '' विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पक्षाचे नेते जाऊन आले. सर्व विधानसभा जागा संदर्भात आढावा घेतला. नागपूर शहरात शिवसेना विधानसभेची एक जागा आणि रामटेक विधानसभेची एक जागा लढणार आहे. त्यासंदर्भात आम्ही चर्चा करू.''

'विधानसभेत विदर्भात चांगला स्कोर करू'

ते म्हणाले, ''निवडणुका जवळ आली आहे, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शिवसेनेचे काम सुरू आहे. लोकसभेची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्यामुळे विधानसभेमध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये महाविकास आघाडी म्हणून काही जागा लढवू. यवतमाळ वाशिम आम्ही जिंकलो बुलढाणा थोड्या मताने आम्ही जागा गमावली. महाविकास आघाडीचा यश पाहता विधानसभेत विदर्भात चांगला स्कोर करू.''

संजय राऊत पुढे म्हणाले की, ''महाराष्ट्रमध्ये सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सरकारमध्ये घेतलं. त्यांच्या विरोधात आम्ही चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे अनेक नेत्याचार त्याच्यावर चौकशी सुरू होती. पण त्यांना काही झालं नाही. प्रत्येक राज्यात भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

SCROLL FOR NEXT