Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर BMC मध्ये ६ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती!

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर BMC मध्ये ६ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती!
Vidhan Sabha Election 2024Saam tv
Published On

आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील संपूर्ण क्षेत्र लक्षात घेतले तर ते मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन महसूल क्षेत्रात मोडते. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे दोन जिल्हे मिळून म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर BMC मध्ये ६ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती!
Ladki Bahin Yojana : '...तर 1500 चे 3000 रुपये होतील', मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं वक्तव्य

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला वेग आला असताना, माननीय भारतीय निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. त्याचप्रमाणे आता, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी व मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक विषयक कामकाज सुनियोजित आणि सुलभ व्हावे, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहावे, या दृष्टीने या सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

१) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी - संजय यादव)

(महसूल क्षेत्र - मुंबई शहर जिल्हा)

(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - वरळी (१८२), शिवडी (१८३ ), भायखळा (१८४), मलबार हिल (१८५), मुंबादेवी (१८६), कुलाबा (१८७)

२) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी)

(महसूल क्षेत्र- मुंबई शहर जिल्हा)

(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मध्य मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - धारावी (१७८), शीव कोळीवाडा (१७९), वडाळा (१८०), माहीम (१८१)

३) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी)

(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ - दक्षिण मध्य मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - अणुशक्ती नगर (१७२), चेंबूर (१७३)

लोकसभा मतदारसंघ - मुंबई उत्तर पूर्व

विधानसभा मतदारसंघ- मुलुंड (१५५), विक्रोळी (१५६), भांडूप पश्चिम (१५७), घाटकोपर पश्चिम (१६९), घाटकोपर पूर्व (१७०), मानखुर्द शिवाजी नगर (१७१)

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर BMC मध्ये ६ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती!
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबरमध्ये अर्ज भरला तरी 3 महिन्यांचे पैसे मिळणार

४) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी - राजेंद्र क्षीरसागर)

(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ- उत्तर मध्य मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - विलेपार्ले (१६७), चांदिवली (१६८), कुर्ला (१७४), कलिना (१७५), वांद्रे पूर्व (१७६), वांद्रे पश्चिम (१७७)

५) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)

(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ - उत्तर पश्चिम मुंबई)

विधानसभा मतदारसंघ- जोगेश्वरी (१५८), दिंडोशी (१५९), गोरेगाव (१६३), वेसावे (वर्सोवा) (१६४), अंधेरी पश्चिम (१६५), अंधेरी पूर्व (१६६)

६) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर)

(महसूल क्षेत्र - मुंबई उपनगरे जिल्हा)

(लोकसभा मतदारसंघ - उत्तर मुंबई)

विधानसभा मतदारसंघ - बोरिवली (१५२), दहिसर (१५३).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com