Nitin Gadkari Saam
महाराष्ट्र

Nitin Gadkari: जात पुढारी निर्माण करतात, जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहे; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी

Nitin Gadkari on Caste Politics: जात पुढारी निर्माण करतात, जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका पुरस्कार सोहळ्यावेळी भाषणादरम्यान म्हटलं आहे.

Bhagyashree Kamble

परखड आणि निर्भीडपणे भाष्य करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारणातील जातीवादावर जोरदार प्रहार केला आहे. जात पुढारी निर्माण करतात, जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहे, असं गडकरी म्हणाले. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार वितरण सोहळा २०२५ आज पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी पुढाऱ्यांना 'आरसा' दाखवला. 'माणूस हा जातीने मोठा नाही तर, गुणाने मोठा असायला हवा', अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.

महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार वितरण सोहळ्यात नितीन गडकरींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती असलेल्या गडकरींनी यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडलं. जात पुढारी निर्माण करतात, जनता जातीवादी नाही, तर पुढारी जातीवादी आहे. माणूस हा जातीने मोठा नाही तर, गुणाने मोठा असायला हवा', असं ते थेट व्यासपीठावरून म्हणाले.

'माझा राजीनामा घ्या अन् त्याला पद द्या'

नितीन गडकरींनी आमदार प्रवीण दटकेंच्या पुत्राला पद देण्यावरूनही टिप्पणी केली.'भाजप आमदार प्रवीण दटके माझ्या घरी आले होते. त्यावेळी दटके यांनी माझ्या पुत्राला भाजप पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष करा, अशी विनंती केली. तेव्हा माझा राजीनामा घ्या आणि त्याला पद द्या, असं म्हणालो. आमदाराच्या पोटातून आमदार नाही. खासदाराच्या पोटातून खासदार नाही. तर, तो जनतेच्या मनातून आला पाहिजे, असंही नितीन गडकरी हा किस्सा सांगताना म्हणाले.

राजकारण म्हणजे केवळ पाच वर्षांची निवडणूक नाही

राजकारण म्हणजे केवळ पाच वर्षांची निवडणूक नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. 'प्रत्येकाला निवडणुकीचं तिकीट हवे असते. पण प्रत्येकाला तिकीट मिळेलच असं नाही. राजकारणात पैसे खर्च होतात. सत्कार होत असताना हार, फोटोला पैसे खूप लागतात. अनेकदा सत्काराला गेल्यावर आनंद होतोच असे नाही, असं प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं.

तुला कोण मुलगी देईल?

नितीन गडकरी यांनी राजकारणात येण्यापूर्वीचा किस्सा सांगितला. 'मला माझी आई आणि बहिणी म्हणत होत्या की नोकरी कर. तेव्हा मी म्हटलं की, मी नोकरी करणारा नाही, तर नोकरी देणारा होईल. मग मला आई म्हणाली की, तुला कोण मुलगी देईल, जसे आता शेतकऱ्यांच्या मुलाला कुणीही मुलगी देत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT