Maharashtra New Highway Saam Tv
महाराष्ट्र

New Expressway: मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक द्रुतगती मार्ग, नागपूर ते चंद्रपूर प्रवास होणार फक्त २ तासांचा

Nagpur - Chandrapur Expressway: महाराष्ट्राला आणखी एक नवीन द्रुतगती महामार्ग मिळणार आहे. नागपूर ते चंद्रपूर प्रवास सुसाट होणार असून हा प्रवास फक्त २ तासांचा होणार आहे. एमएसआरडीसीकडून ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे.

Priya More

Summary -

  • नागपूर–चंद्रपूर प्रवास फक्त २ तासांचा होणार आहे

  • एमएसआरडीसीकडून ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे

  • पर्यावरणीय मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला

  • चंद्रपूर ते नागपूरदरम्यान उद्योग, व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळेल

नागपूर आणि चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नागपूर ते चंद्रपूर प्रवास आता फक्त २ तासांचा होणार आहे. नागपूर ते चंद्रपूर नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी हा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हा नवा महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.

एमएसआरडीसीने नागपूर-चंद्रपूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या सुधारित संरेखनासाठी पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज केला आहे. एमएसआरडीसीने नवीन संरेखनानुसार पर्यावरणीय मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर या नव्या महामार्गाच्या बांधकामाला खऱ्या अर्थाने सुरूवात केली जाईल. हा महामार्ग तयार झाल्यानंतर नागपूर ते चंद्रपूर प्रवास सुसाट होईल. हा प्रवास फक्त २ तासांचा असेल.

डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ४ पदरी आणि २०४ किलोमीटर लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित संरेखनाला मंजुरी दिली होती. पूर्वीच्या मार्गावर काही ठिकाणी कोळसा खाणी असल्यामुळे त्यात बदल करावा लागला होता. या द्रुतगती मार्गाच्या प्रकल्पात चंद्रपूर कनेक्टरचाही समावेश असणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वांना होईल. नागपूर आणि चंद्रपूरदरम्यान व्यापार आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल.

expresswayमुंबई ते नागपूर प्रवास सुसाट करण्यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधला. हा महामार्ग सुरू झाल्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास काही तासांचा झाला. या समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी आणि या महामार्गाला चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांना जोडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

समृद्धी महमार्गाचा विस्तार करण्यासाठी नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदिया, भंडारा – गडचिरोली आणि जालना – नांदेड असे महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. या निर्णयानुसार नागपूर – चंद्रपूर महामार्गाच्या सहा टप्प्यातील कामासाठी एमएसआरडीसीने तयारी देखील सुरू केली आहे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर या महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : हॉटनेसचा तडका! अमृता खानविलकरचा लाल ड्रेसमध्ये किलर लूक, पाहा PHOTOS

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Maharashtra Live News Update: पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार!

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरील लोकल वेळेत धावणार, नवीन मार्गिकेचं काम पूर्ण; कधीपासून होणार सुरु?

Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप ?; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

SCROLL FOR NEXT