Nagarpalika Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश, वाचा संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदांचा निकाल

Nagpur District Nagarpalika Nagar Parishad Election Result : नागपूर जिल्हा नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. बहुतेक ठिकाणी भाजपनं विजयाला गवसणी घातलीय. २७ पैकी २२ जागांवरती भाजपचा विजय झालाय.
Nagpur District Nagarpalika Nagar Parishad Election Result
BJP leaders and workers celebrate after the party’s sweeping victory in Nagpur district municipal elections.saam tv
Published On
Summary
  • नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश.

  • १५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जिल्ह्यात भाजपची पकड अधिक मजबूत.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला नगरपालिका, नगर पंचायतीत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. एकूण १५ पालिका आणि १२ नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. २७ पालिकांपैकी २२ ठिकाणी पालिकांमध्ये भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. एका पालिकेत काँग्रेस, एका ठिकाणी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला यश आलंय .

Nagpur District Nagarpalika Nagar Parishad Election Result
Parbhani Nagarpalika Result: धनंजय मुंडेंच्या भावुक सभेनं जिंकलं, मुंडेंच्या बहिणीचा दणदणीत विजय, भाजपला धक्का

नागपूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी जरी स्वंतत्रपणे लढले. त्यामुळे सर्व ठिकाणी बहुरंगी लढत झाली. पण खरी लढत होती ती काँग्रेस विरुद्ध भाजप. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना यांच्यात लढत झाली. तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे उमेदवार रिंगणात होते. नागपूरमध्ये भाजपने सुरूवातीपासूनच एकला चलो रेची भूमिका घेतली होती. कारण त्यांना संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व स्थापन करायचे होते. भाजपचा निर्णय त्याच्या पथ्यावर पडल्याचं दिसत आहे.

Nagpur District Nagarpalika Nagar Parishad Election Result
Municipal Council Nagar Panchayat Election Result: उत्तर महाराष्ट्रात भाजपला जोरदार झटका; जाणून घ्या संपूर्ण नगरपालिका आणि नगरपरिषदांचा निकाल

कोणत्या ठिकाणी कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून आले?

नागपूर विजयी अंतिम निकाल

नगराध्यक्ष पदावर 27 विजयी

भाजप - 22

काँग्रेस - 1

शिंदे शिवसेना - 2

शेकाप -राष्ट्रवादी शरद पवार - 1

गोंडवाना गंणतंत्र - 1

नागपूर नगरपंचायत

1)मौदा - भाजप- प्रसन्न तिडके- विजयी

2)कांन्द्री कन्हान - भाजप - सुजित पानतावणे

3)निलडोह - भाजप - भूमिका मंडपे,

4)येरखेडा - भाजप- राजकिरण बर्वे,

5)गोधनी - भाजप - रोशना कोलते, महिला

6) बेसा पिपळा - भाजप - कीर्ती बडोले

7)महादुला - भाजप हेमलता ठाकूर(सावजी)

8) बिडगाव - भाजप - विरु जामगडे,

9) पारशीवनी - शिंदेंसेना - सुनीता डोमकी,

10)भिवापूर- सुषमा शिरामे-भाजप

11)कोंढाळी- योगेश चाफले, भाजप

12) बहादूरा- प्रतीक्षा खंडारे ,भाजप

नागपूर नगर परिषद

1)कळमेश्वर नगर परिषद - अविनाश माकोडे - भाजप.

2)सावनेर नगर परिषद - संजना मंगळे - भाजप.

3)रामटेक नगर परिषद - बिकेंद्र महाजन- शिवसेना

4)मोहपा - माधव चर्जन - काँग्रेस

5) काटोल - अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी.

6) बुट्टीबोरी - सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, कॉंग्रेस समर्थीत.

7) खापा - पियुष बोरडे, भाजप,

8) उमरेड - प्राजक्ता कारू-भाजप

9) कन्हान पिंपरी - नराजेंद्र शेंद्रे -भाजप

10)वाडी - नरेश चरडे-भाजप

11) वानाडोंगरी - सुनंदा बागडे-भाजप

12)डिगडोह - पूजा उके-भाजप

13)मोवाड - दर्शना ढोरे- भाजप

14) नरखेड- मनोज कोरडे, भाजपा

15 )कामठी- भाजप- अजय अग्रवाल,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com