Expressway : पुणे ते जळगाव फक्त ३ तासात! नवीन एक्सप्रेस वे नेमका कसा असेल? वाचा

Pune to Jalgaon Expressway: पुणे ते जळगावसाठी नवीन महामार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे तुम्ही फक्त ३ तासात पुण्याहून जळगावला पोहचणार आहात. यामुळे प्रवास सुसाट होणार आहे.
 Pune to Jalgaon
Pune to Jalgaon Saam Tv
Published On
Summary

पुणे ते जळगाव नवीन एक्सप्रेस हायवे मंजुर

पुणे ते जळगाव फक्त ३ तासात गाठता येणार

छत्रपती संभाजीनगरला जोडणार

पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडण्यासाठी एक्सप्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन एक्सप्रेस हायवे आत्याधुनिक असणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर जळगाववरुन पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. तुम्ही फक्त २ तासात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करु शकणार आहे. महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीत बदल घडवून आणणारा हा महत्त्वाचा एक्सप्रेस वे असणार आहे.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक आणि चांगला महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. यामुळे पुणे ते जळगाव अंतरदेखील कमी होणार आहे.

 Pune to Jalgaon
Vande Bharat Express : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

२ तासात पुणे ते छत्रपती संभाजीनगर (Pune-Chhatrapati Sambhaji Nagar in Just 2 hours)

सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. दरम्यान, या नवीन महामार्गामुळे तुम्ही फक्त २ तासात हा प्रवास करु शकतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ३-४ तासांनी कमी होणार आहे, असा दावा नितीन गडकरींनी केला आहे.

समृद्धी महामार्गाला जळगाव जोडणार (Jalgoan to Pune expressway join samruddhi mahamarg)

याचसोबत सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई नागपूर या महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला आहे.

३ तासात पुणे ते जळगाव (Pune to Jalgoan New Expressway)

सध्या जळगावरुन अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. त्यासाठी अडीच तास लागतात. दरम्यान, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे हा कालावधी फक्त १ तासावर येणार आहे. जळगाव- छत्रपती संभाजी नगर असा १ तास प्रवास आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे दोन तास गृहीत धरले तर तुमचा प्रवास फक्त तीन तासाचा होणार आहे. जळगाववरुन पुण्याला फक्त ३ तासात पोहचता येणार आहे.

 Pune to Jalgaon
Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ

पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी १६ कोटी ३१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक , व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

 Pune to Jalgaon
Express Highway: भलतं भारी! जळगाव ते पुणा ना प्रवास फक्त ३ तास मा! जाणून घ्या एक्स्प्रेस हायवेचा संपूर्ण प्लॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com