Express Highway: भलतं भारी! जळगाव ते पुणा ना प्रवास फक्त ३ तास मा! जाणून घ्या एक्स्प्रेस हायवेचा संपूर्ण प्लॅन

Jalgaon to Pune Express Highway : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणाऱ्या नवीन एक्सप्रेस हायवेची घोषणा केली आहे. या महामार्गामुळे जळगाव ते पुणे प्रवासाचा वेळ फक्त तीन तासांवर येणार आहे.
Jalgaon to Pune Express Highway
Union Minister Nitin Gadkari announcing the new express highway project in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • नव्या एक्स्प्रेस हायवेने जळगाव–पुणे प्रवास केवळ ३ तासांत शक्य होणार.

  • पुणे–छत्रपती संभाजीनगर शहरांना जलद कनेक्टिव्हिटी मिळणार.

  • व्यापारी, उद्योग आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार.

महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या सुविधेत क्रांतिकारक बदल घडवून आणणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा अत्याधुनिक, एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच हा प्रस्तावित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर जळगावहून पुण्याला जाण्यासाठी केवळ तीन तास लागतील.

म्हणजेच काय तर प्रवाशांचा निम्म वेळ वाचणार आहे. आता सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्यासाठी सहा ते साडेसहा तासांचा कालावधी लागतो. यामुळे प्रस्तावित उच्चगती महामार्ग पूर्णत्वास आला तर पुणे-छत्रपती संभाजीनगरमधील अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. दुसरीकडे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय.

Jalgaon to Pune Express Highway
झोपडपट्टीधारकांना मिळणार हक्काचं घर; २.५ लाख लोकांना होणार फायदा, सरकारचा मोठा निर्णय

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या महामार्गाला गती देताना जळगावहून मुंबई आणि पुण्याला कमी वेळेत कसे पोहोचता येईल, याबाबत चर्चा झालीय. सध्या अजिंठा, सिल्लोडमार्गे जळगावहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी अडीच तासाचा प्रवास करावा लागतो. हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अवघ्या एक तासावर आणण्याचे ठरलंय.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवासासाठी एक तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे उच्चगती महामार्गावरील प्रवासाचे २ तास गृहीत धरले तर अवघ्या तीन तासांत जळगावहून पुण्याला पोहोचणं शक्य होणार आहे.

Jalgaon to Pune Express Highway
येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

पुणे-छत्रपती संभाजीनगर उच्चगती महामार्गासाठी १६ हजार ३१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. यात उच्च दर्जाचे रस्ते, आधुनिक पूल, उड्डाणपूल, सेवा रस्ते तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com