महाराष्ट्र

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; काठमांडूला कसे पोहोचणार? ३७ महाराष्ट्रीयन भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांनी हलवली सूत्रे, नेमकं काय घडलं?

Maharashtra pilgrims safely travel towards Kathmandu : नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ कैलास मानसरोवर यात्रेकरू न्यालम चेकपोस्टमार्गे काठमांडूकडे सुरक्षित रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्राशी समन्वय साधण्यात आला.

Namdeo Kumbhar

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील 'सागा' येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले होते. सध्या नेपाळमध्ये सर्वत्र पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर हे सर्व भाविक आज सकाळी सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.

नक्की काय घडले होते?

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील ३७ भाविक 'जय गिरनारी ट्रस्ट' (अलिबाग) चे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. यात्रा पूर्ण करून परत येत असताना ते तिबेटमधील सागा भागात अडकले. या सर्व भाविकांचे काठमांडूवरून भारतासाठीचे परतीचे विमान उद्या (२९ ऑगस्ट) दुपारी २ वाजता आहे. त्यामुळे त्यांना वेळेत काठमांडूला पोहोचणे अत्यंत गरजेचे होते.

मुख्यमंत्र्यांचा तातडीचा पुढाकार

या समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी अडकल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. मुख्यमंत्र्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ चक्रे हलवली. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी (MEA) तातडीने संपर्क साधून समन्वय प्रस्थापित केला.

परराष्ट्र मंत्रालयाची मदत अन् सुरक्षित प्रवास

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही वेगाने हालचाली करत आवश्यक ती मदत आणि परवानगी मिळवून दिली. या प्रयत्नांना यश आले असून, सर्व ३७ भाविक आता 'न्यालम चेकपोस्ट' मार्गे काठमांडूकडे सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. ते वेळेत विमानतळावर पोहोचून भारताकडे रवाना होतील.

संकटाच्या वेळी धावून आल्याबद्दल सर्व भाविकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मनापासून आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

Egg Storage Tips: अंडी फ्रिजमध्ये की फ्रिजबाहेर ठेवावी? जाणून घ्या

Friday Horoscope: आज कोणाला मिळणार नशिबाची साथ? तुमच्या राशीचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT