Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी! थेट ₹१४,००० ने स्वस्त होणार सोनं? केंद्र सरकारच्या एका निर्णयाने उडाली खळबळ

gold rate today India : केंद्र सरकार सोन्यावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. निर्णय झाल्यास सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Gold Price Today
Gold Price Todaygoogle
Published On

Gold import duty may be reduced from 15 percent to 6 percent : सोनं खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सराफा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार सोन्यावरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्याच्या विचार करत आहे. सरकारने आयात शुल्क कमी केले तर भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत एकाच झटक्यात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार आयात शुल्क १५ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यांवर आणू शकते. त्यामुळे प्रति १० ग्राम सोन्याच्या दरात १४,००० रुपयांपेक्षा जास्त कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकार का घेणार हा निर्णय?

देशातील परकीय चलन साठा (Forex Reserve) जपण्यासाठी आणि वाढत्या आयात बिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी मे महिन्यात सरकारने सोन्यावरील कस्टम इम्पोर्ट ड्युटी वाढवून १५ टक्के केली होती. मात्र, आता बाजारपेठेतील परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे आणि आगामी सण-उत्सव तसेच लग्नसराईचा काळ लक्षात घेता, सरकार ही ड्युटी पुन्हा कमी करून ६ टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.

Gold Price Today
Gold Rate Today: सोन्याला चकाकी! ५८०० रुपयांनी सोनं महागलं, ७२ तासांत किती किमती वाढल्या?

सोन्याचे दर किती स्वस्त होऊ शकतात?

सध्या दिल्ली आणि प्रमुख शहरांतील सर्राफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १,६३,००० ते १,६४,००० रुपयांच्या आसपास आहे. जर आयात शुल्कात ९ टक्क्यांची कपात झाली, तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ₹१४,००० हून अधिक घसरू शकतात. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति १० ग्रॅम ₹१३,००० ची कपात होऊ शकते. केवळ सोनेच नाही, तर या निर्णयाचा थेट परिणाम चांदीच्या दरावरही होणार असून चांदीचे भावही खाली येण्याची शक्यता आहे.

सुवर्ण बाजारात आणि ग्राहकांवर काय परिणाम होणार?

भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदार देशांपैकी एक आहे. भारत आपल्या गरजेसाठी वर्षाला तब्बल ७०० ते ८०० टन सोने परदेशातून मागवतो. आयात शुल्क कमी झाल्यास परदेशातून सोने मागवणे स्वस्त होईल आणि बाजारात सोन्याचा पुरवठा वाढेल. आगामी सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल.

Gold Price Today
Gold Price Today : सोनं-चांदीच्या दरात अचानक मोठा बदल? २४, २२, १८ कॅरेटचे भाव समोर

गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी काय करावे?

कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय अंमलात आल्यास गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ (ETF) मधील किमतीही घसरतील. त्यामुळे ज्यांना सोन्यामध्ये नवीन गुंतवणूक करायची आहे किंवा दागिन्यांची खरेदी करायची आहे, त्यांनी सरकारच्या अधिकृत घोषणेपर्यंत 'वाट पाहा आणि पाहा' (Wait and Watch) ही भूमिका घेणे फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com