NEET  Saam Tv
महाराष्ट्र

NEET पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा! कुलकर्णीने मोटेगावकरला पुरले १३२ प्रश्न? वाचा

NEET Exam: नीट पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शिवराज कुलकर्णीने मोटेगावकरला १३२ प्रश्न पुरवले असल्याचे समोर आले आहे.

Siddhi Hande

नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा

शिवराज कुलकर्णीने मोटेगावकरला पुरवले १३२ प्रश्न

२२ लाख विद्यार्थ्यांना फटका

'नीट' पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा 'सीबीआय'च्या तपासातून समोर आलाय. मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकरला कुलकर्णीनं तब्बल १३२ प्रश्न पुरवल्याचा उघड झालंय. कुलकर्णीनं हे प्रश्न कसे NTAमधून कसे बाहेर आणले? NTAच्या पॅनलमध्ये मोटेगावकरची आणखी कोण माणसं होती? याबाबत माहिती वाचा

कुलकर्णीने मोटेगावकरला 132 प्रश्न पुरवले?

मॉडर्न कॉलेजची बायोलॉजीची प्राध्यापिका मनीषा मांढरेच्या पेपर फोडण्याच्या चतुराईनं सीबीआयही चक्रावून गेलीये. अशातच आता NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं धक्कादायक खुलासा केलाय. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकरने केवळ पेपरच चोरला नाहीतर थेट NTAच्या मुख्य पॅनलमध्येच आपली माणसे पेरल्याचं सूत्रांनी म्हटलंय. मोटेगावकरने अत्यंत हुशारीने आणि सुनियोजितपणे मोडस ऑपरेंडी राबवल्याचं सीबीआयच्या तपासात उघडकीस आलंय.

प्रश्नपत्रिकेच्या भाषांतराची जबाबदारी असलेल्या प्रा. पी.व्ही. कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न शिवराज मोटेगावकरला पुरवले होते. या प्रश्नांची पीडीएफ मोटेगावकरकडे आधीच उपलब्ध होती. भाषांतरासाठी दिलेले तीन संच कुलकर्णीनं लीक केल्यानं परीक्षेची गोपनीयता धोक्यात आली. इतकंच नव्हे तर शिवराज मोटेगावकरने हे सगळे प्रश्न लिहून घेतले होते, असे तपासात निष्पन्न झालंय.

पी.व्ही.कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यातील थेट कनेक्शन आणि प्रश्न पोहचवण्याची पद्धत तपासात उघड झालीये. इतकंच नव्हे तर निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा मोटेगावकरच्याच क्लासमध्ये शिकवत होता. त्यामुळे दोघांमध्ये आधीपासूनच आर्थिक आणि व्यावसायिक संबंध होते. त्यामुळे कुलकर्णीनंच नीटची प्रश्नपत्रिका फोडून मोटेगावकरला दिली असेल तर ती नेमक्या किती जणांना विकण्यात आली आणि किती विद्यार्थ्यांना त्याला फायदा झाला याचीही चौकशी होणं गरजेचं आहे. कारण प्रश्न २२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

दारू पिऊन गुरूजी झिंगाट, थेट शाळेत येऊन तोऱ्यात बसला! पालकांचा पारा चढला, VIDEO

SCROLL FOR NEXT