

परभणीतील सुजाता नगरमध्ये गोळीबाराची घटना
प्राध्यापक मुंडे यांच्या घरावर तीन राऊंड फायर
जुना वाद असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
परभणी शहर गोळीबाराच्या घटनेमुळे हादरले आहे. परभणीतील सुजाता नगर परिसरातील एका प्राध्यापकाच्या घरावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी मुंडे यांच्या घराच्या दिशेने एकामागून एक तीन राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज येताच नागरिक भयभीत झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. प्राथमिक तपासानुसार, हा गोळीबार जुन्या वादातून झाला असावा असं म्हटलं जात आहे. प्राध्यापक मुंडे यांचा कोणाशी तरी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
याच वादाचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळ्या घराच्या खिडकीवर आणि भिंतीवर लागल्या आहेत. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य घरातच होते, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच परभणी शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहेत. त्याच्या माध्यमातून संशयित आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.भरवस्तीत एका प्राध्यापकाच्या घरावर अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
उत्तर प्रदेशातील सिनौली गावात संशयातून एका तरुणाचा जीव गेला आहे. पत्नीशी अवैध संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याच्या मित्रावर गोळी झाडली. मृत तरुणाचं नाव मुकुल असं असून आरोपी मंजीतने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. मुकुल वारंवार त्याच्या घरी येत असायचा आणि त्याच्या पत्नीशी बोलत असे. यामुळे मंजीतच्या मनात संशय निर्माण झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.