PM मोदींना प्रश्न विचारणारी 'ती' परदेशी पत्रकार अडचणीत! फेसबुक-इन्स्टा अकाऊंट अचानक सस्पेंड, नेमकं काय घडलं?

Helle Lyng : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचे फेसबुक, इंस्टा अकाऊंट सस्पेंड झाल्याचे समोर आले आहे. अकाऊंट सस्पेंड का झालं? याचं कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही.
Helle Lyng
Helle Lyng
Published On

PM Narendra Modi Norway Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांपूर्वी नॉर्वे दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी महिला पत्रकार हेले लेंग (Helle Lyng) यांनी यांनी मोठ्याने ओरडून एक प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर न देताच पंतप्रधान मोदी निघून गेले होते. त्यानंतर हेले लेंग ही पत्रकार जगभरात व्हायरल झाली. भारतामध्येही याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. हेले लेंग यांच्या अडचणी वाढल्याचे समोर आले आहे. हेले लेंग यांचे फेसबुक आणि इंस्ट्रग्राम उकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. हेले लेंग यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

ओस्लो येथे भारत आणि नॉर्वे या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. ही परिषद संपवून पीएम मोदी बाहेर पडत होते, त्यावेळी नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लेंग (Helle Lyng) यांनी त्यांना मोठ्याने ओरडून प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, "पंतप्रधान महोदय, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही?" या घटनेचा काही सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि हेले लेंग एका रात्रीत इंटरनेटवर स्टार बनल्या होत्या. पण त्यानंतर काही तासांतच हेले लेंग यांचे सोशल खाती सस्पेंड झाली आहेत.

Helle Lyng
Weather Update: चक्रीवादळाचं संकट! १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? पाहा IMD चा अलर्ट

पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारल्यानंतर या परदेशी पत्रकाराला भारतातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर, मेटा कंपनीने त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट अचानक सस्पेंड (ब्लॉक) केले आहेत. स्वतः हेले यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, "माझं फेसबुक आणि इन्स्टा अकाऊंट ब्लॉक झालंय. मला अनेक भारतीयांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची होती, पण आता त्याला उशीर होईल. पण मी यामुळे दुःखी नाही, कारण प्रेस फ्रीडम म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मला मोजावी लागलेली ही खूप छोटी किंमत आहे."

Helle Lyng
Helle Lyng साम टीव्ही मराठी
Helle Lyng
Reservation : मागासवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा! ‘त्या’ प्रवर्गात मिळणार थेट एन्ट्री?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com