

NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक केली.
पी. व्ही. कुलकर्णीनंतर मोटेगावकरचे नाव तपासात समोर आले.
परीक्षा होण्याच्या १० दिवस आधी प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
देशात शिक्षणाचा एक आदर्श ब्रँड म्हणून ओळखला जाणारा 'लातूर पॅटर्न' आता नीट पेपरफुटी प्रकरणानंतर चांगलाच चर्चेत आलाय.लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींच्या अटकेनंतर पेपरफुटीच्या प्रकरणात आणखी एक बडा मासा सीबीआय़च्या गळाला लागलाय. त्यामुळे लातूर मुन्नाभाईंची फॅक्टरी कशी झाली आहे ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
ऐकलतं, मॉक टेस्टमधील प्रश्न जसेच्या जसे परिक्षेत आल्याचं सांगणाऱ्या या विद्यार्थीनी आहेत. लातूरच्या RCC क्लासमधील...3 मे रोजी नीटचा पेपर झाल्यानंतर RCCचा संचालक शिवराज मोटेगावकरनं घेतलेल्या ही मुलाखत आता वादात सापडली आहे. कारण मोटेगावकरचं पेपरफुटीचं कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीनंतर मोटेगावकरलाही 11 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयनं बेड्या ठोकल्या आहेत. मोटेगावकरचं NEET कनेक्शन कसं समोर आलं ते पाहूयात.
3 मेचा NEET पेपर RCC क्लासचा संचालक असणाऱ्या शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच पोहचला होता. 14 मे 2026ला पोलिसांनी मोटेगावकरच्या लातूरमधील घरात झडती घेतली. त्यानंतर मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये लीक झालेला पेपर आढळले.मोटेगावकरनं अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशयही सीबीआयला आहे. तसचं मोटेगावकरनं परीक्षा होताच पुरावे नष्ट केल्याचं ही तपासात उघड झालयं.मात्र तपासात मोटेगावकरनं पेपर खरेदी केलेल्या विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास टाळाटाळ केल्यानं मोटेगावकर पेपर फोडणाऱ्या संघटित टोळीचा सदस्य असल्याचा संशय आहे.
दरम्यान RCC क्लासमधील इतर शिक्षकांचीही CBI चौकशी सुरु आहे. मात्र RCC क्लासमधून कोट्यावधींची उलाढाल कशी चालायची पाहूयात. लातूर मधील एका कॉलेजमध्ये केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक असणाऱ्या शिवराज मोटेगावकरनं 20 वर्षांपूर्वी नोकरी सोडून रेणुकाई कोचिंग क्लासेस सुरु केले..त्यानंतर RCC पॅटर्न म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक शहरात मोटेगावकरनं कोचिंग क्लासेस उभारले.
दरवर्षी नीट परिक्षेच्या निकालात RCC पॅटर्नची अनेक मुलं यशस्वी होतात..त्यामुळे हजारो विद्यार्थी RCC क्लासमध्ये प्रवेश घेतात.लातूरमध्येच RCC क्लासेसची 400 विद्यार्थ्यांची एक बॅच, अशा दिवसाला 10 बॅचचे 4 हजार विद्यार्थी रोज क्लाससाठी येतात. एका विद्यार्थ्याची वर्षाला अंदाजे 70ते 80 हजार कोचिंग फी आहे.त्यामुळे मोटेगावकर वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल करायचा.
लातूर पॅटर्नच्या आकर्षणामुळे अनेक सामान्य पालकांनी आपल्या मुलांना लातूरमध्ये नीटच्या तयारीसाठी पाठवलं. मात्र हेच लातूर आता पेपरफुटीचं केंद्र बनल्याचं समोर आलं आणि नीट परीक्षा रद्द झाली. त्यामुळे नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही वर्षात लातूर पॅटर्नच्या नावाखाली लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसचं पेव फुटलंय. लातूरमध्ये अनेकदा नामांकित क्लासचे विद्यार्थी राज्यात अव्वल आल्याचा मोठा गाजावाजा होतो, मात्र 'ते टॉपर विद्यार्थी मूळचे त्या क्लासचे नसल्याची' चर्चा होते. त्यामुळे एकेकाळी गुणवंत विद्यार्थ्यांची खाण असणारा 'लातूर पॅटर्न' आता मुन्नाभाईंची फॅक्टरी म्हणून बदनाम होतोय. मात्र यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्य़ांवर कडक कारवाईची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.