Narkatla Swarg saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पत्राचाळ घोटाळ्यामुळे जेलमध्ये गेले, स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, नीलम गोऱ्हेंचा राऊतांना टोला

Neelam Gorhe Slams Sanjay Raut Over Narkatla Swarg: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच त्यांनी लिहिलेलं 'नरकातल स्वर्ग' हे पुस्तक प्रकाशित केले यावर त्यांच्या विरोधकांकडून टीका होत आहे.

Omkar Sonawane

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी 'नरकतला स्वर्ग' या पुस्तकावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत जेलमध्ये गेले आणि त्यांनी नरकातला स्वर्ग लिहिला. संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळ का आली? ते काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कुठल्या सत्याग्रहामध्ये होते का? पत्राचाळमधील लोकांच्या घरांमध्ये आणि त्यांच्यासोबत गैरव्यवहार केला म्हणून संजय राऊत जेलमध्ये गेले.असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी साक्षीदारांवर आणि जवाब देणाऱ्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्वप्ना पाटकर या साक्षीदार महिलेला शिव्या दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या शिव्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात वायरल झालेला आहे. स्वप्ना पाटकर यांनी जर तक्रार दिली नसती तर संजय राऊत यांना पुस्तक लिहायला मिळालं नसत असे म्हणत या पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकर यांना द्यायला पाहिजे असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

परभणीत आज शिवसेनेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळावा झाल्यानंतर नीलम गोऱ्हेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत हे आपण सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

ते ज्यांच्यावर आरोप करत आहेत, ते मोदी आणि शहा साहेब किंवा शिंदे साहेब हे स्वतः समोर आहेत आणि ते त्या पदाचा या पुस्तकाच्या प्रमोशनासाठी पुरेपूर वापर करुन घेत आहेत. टीआरपीच्या खेळामध्ये आपण कसे पुढे आहोत, हेच दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहे अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT