Minakshi Jaiswal : घरात घुसून १३ वेळा चाकूने वार, १८ डिसेंबर २०१४चं मीनाक्षी जयस्वाल हत्याकांड; १० वर्षांनी ऐतिहासिक निर्णय

Meenakshi Jaiswal Murder Case : मृत मीनाक्षी जयस्वाल यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगाव कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. हा खटला तब्बल १० वर्षं चालला असून, अखेर मीनाक्षी जयस्वाल यांच्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे.
Meenakshi Jaiswal Murder Case
Meenakshi Jaiswal Murder CaseSaam Tv News
Published On

नवी मुंबई : १८ डिसेंबर २०१४ रोजी माजी महिला तथा बाल हक्क आयोग अध्यक्षा ॲड. मीनाक्षी जयस्वाल यांची त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरने साथीदारासह निर्घृण हत्या केली होती. दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसून तेरावेळा चाकूने वार करत त्यांची हत्या करून दागिने चोरले होते. परिस्थितीजन्य पुरावे आणि २० साक्षीदारांच्या साक्षांवरून पनवेल न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मृत मीनाक्षी जयस्वाल यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगाव कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. हा खटला तब्बल १० वर्षं चालला असून, अखेर मीनाक्षी जयस्वाल यांच्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं.

Meenakshi Jaiswal Murder Case
Latur Accident : भरधाव वाहनाची बाईकला मागून धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; १ महिला अन् २ पुरुषांचा समावेश

पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची हत्या

दरम्यान,पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याने सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी ग्रँड हॉटेलसमोर ही घटना घडली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे (३९ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरामधील मोशी ग्रँड हॉटेलसमोर ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे या तरुणावर ५ जणांनी जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने सपासप वार करत या ज्ञानेश्वरची हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वरचे आपल्याच गावातील काही लोकांशी आर्थिक संबंध होते. या आर्थिक संबंधाच्या वादातूनच त्याची हत्या करण्यात आली.

Meenakshi Jaiswal Murder Case
Ramesh Bornare : तू खूप दिवसांपासून डोक्यात आहेस; शिंदेंचे आमदार रमेश बोरनारेंची भाजप कार्यकर्त्याला मारहाण; पोलिसही तक्रार घेईना

पाच आरोपींनी मिळून ज्ञानेश्वर बर्गेची धारदार कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाचही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अवघ्या काही तासांत त्यांना बेड्या ठोकल्या. अशोक महाळस्कर, रोहन महाळस्कर, प्रसाद महाळस्कर, अमोल निरे आणि संकेत जेद या ५ आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Meenakshi Jaiswal Murder Case
Beed News : जीवाची भीक मागितली, हात जोडून गयावया केलं; बीड हादरवणारा आणखी एक व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com