Latur Accident : भरधाव वाहनाची बाईकला मागून धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; १ महिला अन् २ पुरुषांचा समावेश

Latur Zaheerabad Highway Accident : क्रुझर आणि दुचाकीचा हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दुचाकीवरील दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
Latur bike cruiser accident
Latur bike cruiser accidentSaam Tv News
Published On

लातूर : राज्यात दररोज अपघाताच्या घटना घडत असतात, आणि या अपघातांमध्ये अनेकांचा जीव देखील जातो. असाच एक भीषण अपघात लातूर-जहीराबाद महामार्गावरच्या हलगरा पाटीजवळ झाला आहे. क्रुझर आणि दुचाकीचा हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दुचाकीवरील दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, क्रूझर गाडीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, मयतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com