Gulabrao Patil : संजय राऊत महालोफर माणूस; गुलाबराव पाटील यांची जोरदार टीका

Jalgaon News : खासदार संजय राऊत यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यात लिहिले आहे की, नरेंद मोदी गुजरात दंगलीतील संशयित असताना त्यांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यातून बाहेर काढले होते
Gulabrao Patil Sanjay Raut
Gulabrao Patil Sanjay RautSaam tv
Published On

जळगाव : शिंदेंच्या शिवसेनेला लोचटांची शिवसेना असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिउत्तर देत जोरदार टीका करताना खासदार संजय राऊत हा महालोफर माणूस आहे. त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यावे या मताचा असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हटले आहे. 

जळगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमाशी बोलताना संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्या संबंधाविषयी देखील मंत्री पाटील यांनी मत व्यक्त केले. तर बाळासाहेबांची शिवसेना अजून संपलेली नाही. कारण आम्ही कार्यकर्ते आजही जिवंत आहोत; असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

Gulabrao Patil Sanjay Raut
Bhandara : नोकरी मिळविण्यासाठी महिलेची बनवाबनवी उघड; बनावट गुणपत्रिकेच्या आधारे बनली अंगणवाडी सेविका

दरम्यान खासदार संजय राउत यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यात लिहिले आहे की, नरेंद मोदी गुजरात दंगलीतील संशयित असताना त्यांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यातून बाहेर काढले होते. अमीत शहा संशयित असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना बाहेर काढले. भाजपला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्यावरही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी उपकाराची भाषा करण्याऐवजी दोघांचे पक्ष फोडले. याबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध होते. त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. राउत काही त्यावेळी मध्यस्थी नव्हते, तर संपादक होते. त्यांना भाजप- शिवसेनेमध्ये काय चालले आहे. याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.  

Gulabrao Patil Sanjay Raut
Water Shortage : भाटघर, नीरा देवघर धरणाने गाठला तळ; विहिरी आटल्याने पाणीटंचाईची समस्या

उबाठात एकटेच असल्याने राऊत बोलताय 

खासदार संजय राउत यांनी शिंदेंची शिवसेना लोफरांची आहे; असे आरोप केला आहे? त्यावर पालकमंत्री म्हणाले, संजय राउत महालोफर आहे. हाड्याचा बसणं आणी डंकच मोडणं एक होणे’ असा आहे. संजय राऊत एकटाच शिवसेनेत (उबाठा) आहे. यामुळे राऊत बोलत आहे; अशा शब्दात देखील गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com