Sharad Pawar decided to step down as NCP president saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Retirement Speech: निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाले शरद पवार? वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे

Sharad Pawar resigns as NCP chief : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा केली.

Chandrakant Jagtap

Sharad Pawar decided to step down as NCP president: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्या असल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज अचनाक त्यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.

निवृत्तीच्या भाषणात नेमके काय म्हणाले पवार...?

राज्यसभेची अजून तीन वर्ष बाकी आहेत,

तीन वर्षांनी पुन्हा निवडणूक लढवणार नाही.

कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला

आपण मला खंबीर साथ दिली हे मी विसरू शकत नाही

राष्ट्रवादीची सदस्य समिती नेमावी

समितीनं संघटनेची जबाबदारी कुणाला द्यायची याचा निर्णय घ्यावा

सगळ्यांनी बसून पुढचा निर्णय घ्यावा

माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातून नाही

पवारांचा निर्णय कार्यकर्त्यांना नामंजूर

पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी पवारांवर नाराजी व्यक्त केली. साहेब आम्हाला हा निर्णय मान्य नाही, तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हीच आमचे आध्यक्ष आहात, तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो, तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तुम्ही निर्णय मागे घ्या अशा प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

जयंत पाटलांसह अनेकांना अश्रू अनावर

पवारांनी पदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक कार्यकर्ते भावूक झाले. अनेकांना अश्रू देखील अनावर झाले. तर काही कार्यकर्त्यांनी रोकठोक भूमिका घेत तुम्ही निर्णय मागे घ्या अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील करण्यास सुरुवात केली आहे. (Maharashtra Politics)

अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत केलं

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्ते नाराज झाले. यानंतर कार्यक्रमात बराच गोंधळ झाला.

अजित पवार कार्यक्रत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांवर ओरडून देखील अजित पवारांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र कार्यकर्ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अखेर शांत करत आम्ही पवार साहेबांना 5 वाजता भेटू आणि तुमच्या मनासारखा मार्ग काढू असे अश्वासन दिले. त्यानंतर शरद पवार सिल्व्हर ओक या निवसस्थानी निघून घेले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT