Sharad Pawar decided to step down as NCP president: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे असे म्हणत शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्या असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज त्यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली.
पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी पवारांवरनाजी व्यक्त केली. साहेब आम्हाला हा निर्णय मान्य नाही, तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हीच आमचे आध्यक्ष आहात, तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो, तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तुम्ही निर्णय मागे घ्या अशा प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
पवारांनी पदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक कार्यकर्ते भावूक झाले. अनेकांना अश्रू देखील अनावर झाले. तर काही कार्यकर्त्यांनी रोकठोक भूमिका घेत तुम्ही निर्णय मागे घ्या अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील करण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्ते नाराज झाले. यानंतर कार्यक्रमात बराच गोंधळ झाला. अजित पवार कार्यक्रत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
अनेकांवर ओरडून देखील अजित पवारांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र कार्यकर्ते काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अखेर शांत करत आम्ही पवार साहेबांना 5 वाजता भेटू आणि तुमच्या मनासारखा मार्ग काढू असे अश्वासन दिले. त्यानंतर शरद पवार सिल्व्हर ओक या निवसस्थानी निघून घेले.
आता अजित पवारांसह पक्षातील प्रमुख नेते सायंकाळी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत आजच निर्णय घेऊन असे अश्वास प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे पवारांचा निर्णय बदलतो की राष्ट्रवादीला नवीन अध्यक्ष मिळतो हे पाहावं लागणार आहे.
जयंत पाटील यांना अश्रू अनावर
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही थांबणार असाल तर आम्हीही थांबतो अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
'तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो'
शरद पवारांच्या निर्णयाला सर्वांनी नकार दर्शवला असून तुमचा हा निर्णय आम्हाला नामंजूर आहे अशी घोषणा माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. (Latest Political News)
दिलीप वळसे पाटील भावूक
आदरणीय साहेब आज आपण हा निर्णय घेतला महाराष्ट्र आणि देशातील कार्यकर्त्यांना मान्य नाही अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. आपण गोरगरिबांसाठी, समाजासाठी आधार आयुष्यभर उभा केला, त्याच्यामधून राजकारण न करता सगळ्यांच्या जीवनात आनंद कसा येईल हे पाहिले. शेतकऱ्यांची काळजी घेतली. वेळ अशी आलीय की यावेळी राष्ट्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्षांना एकत्र करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी ही संघटा आहे, ती बळकट होत आहे. त्यामुळे आपण जो निर्णय घेतलाय तो अजिबात कुणालाही मान्य नाही. तो निर्णय मागे घ्यावा अशी विनंती दिलीप वळसे पाटील यांनी केली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.