Sharad Pawar Resign: शरद पवारांच्या निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठींबा! कार्यकर्त्यांना खडसावत म्हणाले; दुसरा पक्षाध्यक्ष...

Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पण अजित पवार हेच शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit PawarSaamtv
Published On

Sharad Pawar Resign: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेतली आहे. ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते भावुक झाले आहेत. संबंधित निर्णय लगेच मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Ajit Pawar
Vinayak Raut News : त्यांच्या गमजा, लाचारी, भाजपनं केवळ भुंकण्यासाठी पाळलं; राणेंचा बाजार उठवणार : विनायक राऊत

यावेळी कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. पण फक्त अजित पवार हेच शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. याबाबत अजितदादांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पवारांच्या या निर्णयावरुन चांगलेच ठणकावल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले अजित पवार...

"सगळ्यांच्या भावना ऐकल्या, पाहिल्या. मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. ते अध्यक्ष नाहीत म्हणजे म्हणजे पक्षात नाही असे नाही. कॉंग्रेस पक्षाबाबत आपण पाहत आहोत, खर्गे अध्यक्ष असतील तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात," असे अजित पवार म्हणाले. तसेच "नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार झालेला तुम्हाला मान्य नाही का," असा सुचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Retirement: साहेब, तुम्हाला परस्पर निर्णय घ्यायचा अधिकार नाही; जयंत पाटलांना रडताना पाहून शरद पवारांच्याही डोळ्यांत पाणी

नवीन अध्यक्ष नको का...

"वय झाले की नवीन लोकांना संधी देतो. तश्या गोष्टी होतील तुम्ही का काळजी करता? कोणीही अध्यक्ष झाले तरी, पक्ष साहेबांच्याच जीवावर चालणार आहे. असे म्हणत पवार साहेब भाकरी फिरवायची आहे म्हणाले, मात्र आज त्यांनीच मोठा निर्णय घेतला असे म्हणत पक्षाची वाटचाल साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com