Sharad Pawar Retirement: सुप्रिया तू बोलू नकोस, अजित पवारांनी थांबवताच कार्यकर्त्यांचा आग्रह, म्हणाले, सुप्रियाताईंना बोलू द्या!

Sharad Pawar retirement : खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना अजित पवार यांनी 'सुप्रिया तू बोलू नकोस, असा सल्ला दिला.
Sharad Pawar Retirement
Sharad Pawar RetirementSaam tv

Sharad pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी या निर्णयाची घोषणा केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना अजित पवार यांनी 'सुप्रिया तू बोलू नकोस, असा सल्ला दिला. (Latest Marathi News)

शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी अजित पवार म्हणाले, 'सगळ्यांच्या भावना ऐकल्या, पाहिल्या. मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. ते अध्यक्ष नाहीत म्हणजे म्हणजे पक्षात नाही असे नाही'.

Sharad Pawar Retirement
Sharad Pawar News: शरद पवारांच्या घोषणेनंतर ठाकरे गटात चलबिचल; उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर जाणार

'काँग्रेस पक्षाबाबत आपण पाहत आहोत, खर्गे अध्यक्ष असतील तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात," असेही अजित पवार म्हणाले. तसेच "नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार झालेला तुम्हाला मान्य नाही का," असा सुचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Sharad Pawar Retirement
Ramdas Kadam On Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची टीका करण्याची पात्रता नाही; रामदास कदम यांचा हल्लाबोल

नवीन अध्यक्ष नको का...

"वय झाले की नवीन लोकांना संधी देतो. तशा गोष्टी होतील तुम्ही का काळजी करता? कोणीही अध्यक्ष झाले तरी, पक्ष साहेबांच्याच जीवावर चालणार आहे. असे म्हणत पवार साहेब भाकरी फिरवायची आहे म्हणाले, मात्र आज त्यांनीच मोठा निर्णय घेतला असे म्हणत पक्षाची वाटचाल साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी अजित पवार यांनी न बोलण्याचा सल्ला दिला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना बोलू द्या, अशी विनंती केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com