nationalist congress party sharadchandra pawar oppose medical college in hinganghat wardha  Saam Digital
महाराष्ट्र

वर्धा : वैद्यकीय महाविद्यालय वेळामध्ये पळविण्याचा आमदारांनी साधला डाव, शरद पवार गटाचा आंदाेलनाचा इशारा

nationalist congress party sharadchandra pawar oppose medical college in hinganghat wardha : आमदारच्या कार्यकर्त्यांनी परिसरात आधीच जमिनी घेतल्याने हे एक पूर्ण योजनाबद्ध पद्धतीने केलेले काम असल्याचा आरोप अतुल वांदिले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

हिंगणघाट शहरासह आजूबाजूला मोठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असताना देखील एका उद्योगपतीकडून दान म्हणून शहरापासून सात किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वेळा येथील जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निवडल्या जातं आहे. यामागे स्थानिक भाजप आमदार समीर कुणावार यांचा व्यक्तिगत स्वार्थ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आज (शनिवार) माध्यमांशी बाेलताना केला. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच झाले पाहिजे अन्यथा माेठं आंदोलन छेडले जाईल असा इशारा वांदिले यांनी राज्य सरकारला दिला.

हिगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावा याकरिता हिंगणघाट येथील संघर्ष समितीने 208 दिवस आंदोलन केले. मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्री यांनी वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे निर्माण करू अशी घोषणा करून जिल्हाधिकारी यांना जागा निश्चित करण्याच्या सूचना केल्या हाेत्या.

वांदिले म्हणाले आता हे महाविद्यालय वेळा येथे करण्यासाठीचा प्रस्ताव तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवत तो अवर सचिवाना पाठविण्यात आला आहे. शहरात शासनाची जागा असतांना वेळा येथील एका उद्योगपतीने शासनाला दान स्वरूपात देऊ करणाऱ्या जागेवर का उभारण्यात येत आहे हे न समझणारे आहे.

स्थानिक आमदार समीर कुणावर हे वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथेच का नेत आहेत शासनाकडे स्वतःची जागा असतांना कोणी भीक दिली तर कशाला घ्यावी असे म्हणत वांदिले यांनी आमदार हे मूठभर उद्योगपती यांना मालामाल करून मलाई खाऊन राहिले. यात स्थानिक आमदारांची भागीदारी आहे असं शंभर टक्के वाटते असा गंभीर आराेप वांदिलेंनी केला.

दरम्यान हिंगणघाट शहराच्या बाहेर मेडिकल कॉलेज उभारल्याने हिंगणघाट शहरातील बेरोजगार तरुणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यामुळे 15 जुलै पर्यंत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT