Wardha : वर्ध्यातून वैद्यकीय महाविद्यालय पळविण्याचा राजकारण्यांचा डाव? संभाजी ब्रिगेड आक्रमक

लोकसंख्येचा विचार करुन निर्णय घ्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
sambhaji brigade andolan for medical college in wardha
sambhaji brigade andolan for medical college in wardhasaam tv
Published On

- चेतन व्यास

Wardha News :

वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट किंवा आर्वीला व्हावे, याकरिता नेते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करीत आहेत. परंतु हे महाविद्यालय वर्धा (wardha medical college) येथेच व्हावे अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या (sambhaji brigade) वतीने करण्यात आली आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदाेलन करुन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांना त्याबाबतचे निवेदन दिले. (Maharashtra News)

राज्य शासनाने वर्धा जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची घोषणा केली. याकरिता साटोडा परिसरात याची उभारणी करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. मात्र, हे वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट किंवा आर्वीला व्हावे यासाठी काही राजकीय मंडळींचे प्रयत्न सुरु आहेत.

sambhaji brigade andolan for medical college in wardha
Shirdi Sai Darshan : भाविकांनाे! साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी 'ही' गाेष्ट लक्षात ठेवा, वाचा उच्च न्यायालयाचा आदेश

हिंगणघाट किंवा आर्वी येथून जिल्ह्यातील इतर भागांचे अंतर, वाहतुकीची साधने आणि लोकसंख्येचे प्रमाण बघता, ही मागणी अत्यंत अव्यवहार्य, चुकीची व गोरगरीब समुदायावर अन्याय करणारी आहे असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे. त्यामुळेच आंदाेलन छेडल्याचे आंदाेलकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

हिंगणघाट व आर्वी या दोन्ही भागांतील नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे वर्धा शहरालगत सावंगी व सेवाग्राम ही दोन रुग्णालये आहेत. त्यामुळे तेथे नवीन रुग्णालयाची गरज नाही. मात्र, ही दोन्ही रुग्णालये खासगी व निमशासकीय असल्यामुळे येथे उपचारासाठी रुग्णांना पैसे खर्च करावे लागतात.

अंतराच्या दृष्टीने विचार केल्यास वर्धा शहरापासून आष्टी व कारंजा वगळता, इतर सर्व तालुके जवळ, म्हणजे १८ ते ५८ किलोमीटरच्या परिघात आहे. परंतु हिंगणघाटपासून समुद्रपूर हा एकमेव तालुका वगळता, सर्व तालुके ४२ ते १२४ किलोमीटर अंतरावर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आर्वीपासून कारंजा व आष्टी वगळता, इतर सर्व तालुके ४० ते ९९ किलोमीटरच्या अंतरावर आहेत. तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास वर्धा हेच सोयीचे ठिकाण ठरतात असे संभाजी ब्रिगेडला वाटते.

Edited By : Siddharth Latkar

sambhaji brigade andolan for medical college in wardha
Success Story: निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा तांदळाचे महत्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com