Ramdas kadam Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Kadam: समाज अंगावर आला तेव्हा डेंग्यू झाला; रामदास कदमांची अजित पवारांवर टीका, राष्ट्रवादीकडून सडेतोड प्रत्युत्तर

Ramdas Kadam: गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आजारपणामुळे माध्यमांपासून दूर आहेत.

Bharat Jadhav

Ramdas Kadam Comment On AJit Pawar :

शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे ऐन दिवाळी सणात राजकारणात फटाके फुटले. आज दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दोघांमधील वाद शंभर टक्के मिटल्याचं रामदास कदम म्हणाले. त्यावेळी त्यांनी आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर टीकेचे बाण सोडले. समाज अंगावर आला तेव्हा अजित पवार यांना डेंग्यू झाला असल्याची टीका त्यांनी केली. कदमांनी केलेल्या आरोपावर अजित पवार गटाकडून सडेतोड उत्तर देण्यात आलंय. (Latest News)

गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आजारपणामुळे माध्यमांपासून दूर आहेत. अजित पवार यांना डेग्यूची लागण झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिलाय. परंतु राजकीय नेत्यांकडून त्यांच्या आजारपणावर टीका केली जाते. आज गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी कदमांसोबत बैठक बोलवली होती.

यावेळी रामदास कदम यांनी किर्तीकर आणि त्यांच्यातील वाद कशामुळे सुरू झाला, ते सांगितलं. तसेच काही मतभेद असेल तर आधी मुख्यमंत्र्यांकडे जावून त्याची माहिती द्यावी, त्यानंतर माध्यमांकडे जावे, असं आपण मुख्यमंत्री शिंदेंना सांगितल्याचं रामदास कदम म्हणाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या दोघातील वाद मिटल्याचं म्हणताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कधी कधी अजित दादांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार मुख्यमंत्री यांच्या विरोधात आंदोलन करताय. जेव्हा समाज अंगावर आला तेव्हा डेंग्यू झाला. हे मला काही समजत नाही. पण ते दादा आहेत ते काहीही करू शकतात, अशा शब्दात रामदास कदमांनी अजित पवार यांच्या टीका केली.

कदमांच्या टीकेला अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. अजित पवारांवर बोलण्याएवढे रामदास कदम मोठे नाहीत. त्यांनी दादांच्या आजारपणावर बोलले यातून त्यांची संस्कृती दिसून येते. पवार कुटुंब राज्याची परंपरा जपत आहेत. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीबाबत बोलणं दुर्दैवी आहे. नाहीतर त्यांच्यावर डोळ्यांना झंडुबाम लावण्याची वेळ येईल, असं सडेतोड उत्तर राष्ट्रवादीकडून देण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Largest Parrot: जगातील सर्वात मोठा पोपट कोणता?

Anganewadi Jatra: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी गाव आहे तरी कुठे? यात्रेची खास परंपरा

BMC Election: दुबार-तिबार नाही, तर ४ मतदारांची १०३ वेळा नावं, मतदारयादीतला सर्वात मोठा घोळ उघड

Methi Pulao Recipe: टिफिनसाठी पालेभाज्या-चपातीचा कंटाळा आला? ट्राय करा मेथीचा झणझणीत पुलाव, एकदा रेसिपी वाचाच

टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; धाकड ऑलराउंडरचं कमबॅक, शुभमन गिलबाबत घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT