Sharad Pawar: कथित व्हायरल जात प्रमाणपत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'जन्मानं दिलेली जात...'

Sharad Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी जातीचा दाखल घेतला आहे, असा दावा काहींनी सोशल मीडियावरून केला होता.
sharad pawar Reaction on viral caste OBC Certificate maratha reservation diwali padwa baramati
sharad pawar Reaction on viral caste OBC Certificate maratha reservation diwali padwa baramatisaam tv
Published On

Sharad Pawar Latest News

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी जातीचा दाखल घेतला आहे, असा दावा काहींनी सोशल मीडियावरून केला होता. यासंदर्भात त्यांचे कथित जात दाखला देखील व्हायरल करण्यात आला होता.

दरम्यान, या दाखल्याच्या बाबतीत खुद्द शरद पवार यांनी खुलासा करत आज प्रतिक्रिया दिली आहे. "जन्माने दिलेली मी लपवू शकत नाही, सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय आहे", असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

बारामती येथील गोविंद बागेत आज पवार कुटुंबियांकडून दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी सडेतोड उत्तरे दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

sharad pawar Reaction on viral caste OBC Certificate maratha reservation diwali padwa baramati
Rohit Pawar News: फडणवीस ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत; रोहित पवारांचा गंभीर आरोप

'मराठा आरक्षणावर दुर्लक्ष करुन चालणार नाही'

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं. "मराठा तरुणांच्या भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू", असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षणाबाबत एकप्रकारे आश्वासन दिलं.

मराठा-ओबीसीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

"मराठा-ओबीसी (Maratha-OBC) समाजात वाद नाही, मात्र काही लोकांकडून जाणून बुजून असं वादाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे". असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. लोकांच्या न्यायाचे प्रश्न सुटले पाहिजेत, असंही ते म्हणाले.

साऱ्या जगाला माझी जात कोणती

मी व्हायरल झालेला दाखला बघितला. मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्या शाळेत होतो त्याचा दाखला खरा आहे. त्यामधील जात, धर्म या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा इंग्रजीमधील दाखला फिरवला आणि त्यामध्ये माझ्यापुढे ओबीसी लिहीलं.

ओबीसी समाजाबद्दल मला आदर आणि आस्था आहे. पण जन्मानं प्रत्येकाची जी जात असते ती मी लपवू इच्छित नाही. साऱ्या जगाला माझी जात कोणती ते माहिती आहे. पण जातीवर मी कधीच राजकारण केलं नाही आणि करणारही नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

sharad pawar Reaction on viral caste OBC Certificate maratha reservation diwali padwa baramati
Sanjay Raut News: रामलल्ला तुमच्या मालकीचा आहे का? माफी मागा म्हणत संजय राऊतांची अमित शहांवर सडकून टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com