Sanjay Raut News: रामलल्ला तुमच्या मालकीचा आहे का? माफी मागा म्हणत संजय राऊतांची अमित शहांवर सडकून टीका

रामलल्ला तुमच्या मालकीचा आहे का?" असा तिखट सवाल राऊतांनी शहांना विचारला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam tv
Published On

Sanjay Raut News:

सध्या ५ राज्यांच्या निवडणुकांकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. आपला विजय व्हावा यासाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधनीला सुरूवात केली आहे. मध्यप्रदेशमध्ये गृहमंत्री अमित शहांनी प्रचारसभेवेळी रामलल्लावरून केलेल्या वक्तव्याने खासदार संजय राऊतांनी अमित शहांना माफी मागण्यास सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut
#shorts : Sanjay Raut On Shinde Group : मुंब्र्यावरून राऊतांनी शिंदेंना सुनावलं..

"अमित शहांचं हे विधान अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक आहे. जर मतं दिली तर तुम्ही रामल्लाचं दर्शन घेऊ शकाल. मतं दिली नाही तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील, अशा पद्धतीने अमित शहा बोलत होते असं असं संजय राऊत म्हणाले. तसेच रामलल्ला तुमच्या मालकीचा आहे का?" असा तिखट सवालही राऊतांनी शहांना विचारला आहे.

"रामलल्लाने तुम्हाला एजंट केलंय कां? रामलल्ला सगळ्यांचे आहेत. त्यांच्यावर मालकी हक्क सांगणारे तुम्ही कोण आहात? रामलल्लाचे मंदिर उभे करण्यात भाजपचे योगदान नाही. या देशात असंख्य राम भक्त, त्यांचा त्याग आणि बलिदानातून राम मंदिर उभं राहिलंय. त्यामुळे शहांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत आणि जनतेची माफी मागावी.", असं संजय राऊत म्हणालेत.

काय म्हणाले होते अमित शहा?

गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत सांगितलं की, "आम्हाला मतं दिली आणि भाजपचं सरकार आलं तर आयोध्येत रामलल्लाचं मोफत दर्शन दिलं जाईल." अमित शहांच्या याच वक्तव्याने संजय राऊतांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे.

"राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नावावर केलेला नाही. म्हणून हे सर्व शब्द अमित शहांनी मागे घेतले पाहिजेत. आम्हाला मत दिलं तर मोफत दर्शन. नाही तर आम्ही ठरवणार दर्शन द्यायचं की नाही. म्हणजे भाजपला मत दिलं नाही तर त्या व्यक्तीला आयोध्येतून परत पाठवणार?", असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut
Mumbai Crime News: फटाका जवळ फोडल्याच्या रागातून ४ जणांवर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com