सचिन गाड
राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. या सणानिमित्त लहान मुले, तरुण मंडळी फटाके फोडत आहेत. मात्र, या फटाक्यामुळेच मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. फटाका जवळ फुटल्याच्या रागातून चौघांवर जीवघेणा केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चित्तलवाड (२२) आणि त्याचा मित्र विशाल हा गोवंडीच्या गौतम नगर येथे रविवारी रात्री फटाके फोडत होते. यावेळी निखिल आणि त्याचा भाऊ निलेश भालेराव जवळच बसले होते.
गणेश आणि विशाल या दोघांचा फटाक्याचा बॉम्ब हा जवळच बसलेल्या निखिल आणि त्याचा भाऊ निलेश भालेराव यांच्या जवळ जाऊन फुटला. यावरून निखिल आणि विशाल यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली आहे.
दोघांचे भांडण झाल्याने गणेश भांडण मिटविण्यासाठी गेला. त्यावेळी निखिल त्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दोघांमधील वाद वाढल्याने त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या किरण, इब्राहिम, फैजल आणि अविनाश यांनी मध्यस्थी करत दोघां भावांना शांत केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भांडण झाल्यानंतर निखिल आणि निलेश घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर काही वेळेत परत येऊन गणेशच्या पोट , छाती आणि मानेच्या डावीकडील बाजूस चाकूने वार केले. त्याचबरोबर विशालच्या पोटावर चाकून वार केले. यावेळी गणेश आणि विशालचे मित्र मदतीला धावून आले. मात्र, या दोघा भावांनी त्यांच्यावरही हल्ला केला.
या हल्ल्यात किरणच्या डाव्या मांडीवर वार केले आहेत. तर इब्राहिमचा छोटा भाऊ फैजलच्या हातावर वार करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर गणेशवर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर त्याच्या तिन्ही मित्रांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. या दोन्ही भावांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या कलामंतर्गत अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.