Manasvi Choudhary
उन्हाळ्यात उन्हात बाहेर पडल्यानंतर सूर्याच्या प्रखर अतिनील किरणांमुळे त्वचा काळी पडते त्वचेवर हे डाग तसेच राहतात.
त्वचेवरचे काळे डाग घालण्यासाठी तुम्ही पार्लरला जाण्यापेक्षा स्वयंपाकघरातील सोपे उपाय करून पाहा.
बेसन आणि दही हे चेहऱ्यासाठी गुणकारी मानले जाते. आयुर्वेदात फार पूर्वीपासून याचा वापर केला जात आहे. बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते, तर दही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते.
टोमॅटो हे त्वचेचा काळवंडलेपणा झटपट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. टोमॅटोचा गर काढून चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे चोळा आणि नंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
बटाटा हा नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे टॅनिंग काढण्यास मदत करते.
उन्हामुळे त्वचेची जळजळ होत असेल तर कोरफड आणि काकडी वापरा काकडी त्वचेला थंडावा देते आणि कोरफड त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते.
पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते, जे मृत त्वचा काढून टाकते आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.